मुंबई : प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या सौंदर्याला मारक ठरतात. त्यामुळे घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण याचा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो. अशावेळी सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय करावे? तर स्वयंपाकघरातील हे पदार्थ सुरकुत्या कमी करण्यास मदत करतील आणि त्याचे काही साईड इफेक्ट्सही नाहीत. तर पहा कोणते आहेत ते पदार्थ...


नारळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळाच्या दुधात अॅंटीऑक्सीडेंट आणि अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात. त्यामुळे सुरकूत्या दूर राहतात. यासाठी अर्धा कप नारळाच्या दूध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून तीनदा करा.


केळ


त्वचेसाठी केळं अतिशय उत्तम. यात अॅँटी एजिंग, व्हिटॉमिन ए आणि बी असल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. पिकलेले केळं कुस्करा. त्यात मध आणि गुलाबजल घाला. त्यानंतर त्यात दही घाला. चेहऱ्याला पेस्ट लावण्यानंतर १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. 


बटाटा


त्वचेला टाईटनेस येण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. अर्धा बटाट्याचा रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावा. हा उपाय नियमित करा. ते शक्य नसल्यास आठवड्यातून ३ हा उपाय केल्याने महिन्याभरात फरक जाणवेल.


मध


मधात एक नैसर्गिक स्वीटनर असते ते माईश्चराईजरचे काम करते. मधामुळे फक्त सुरकुत्या दूर होतात असे नाही तर त्यातील अॅंटीऑक्सीडेंटमुळे त्वचाही हेल्दी राहते.