मुंबई : अनेक जणांना अॅसिडिटीचा मोठा त्रास होतो. डोकं दुखणं, मानदुखी, छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, अर्धशिशी, अस्वस्थ होणे अशा प्रकारचा त्रास होतो. झोप पूर्ण न होणं, जागरण, उपाशी राहाणं, चुकीची जीवनशैली, अवेळी खाणे, झोपेच्या सतत बदलत्या वेळा यामुळे त्रास होत असतो. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी अनेक जण गोळ्या घेतात. परंतु अशा गोळ्यांमुळे काही वेळ बरं वाटतं परंतु पुन्हा त्याचा त्रास सुरु होतो. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा शरीरावरही घातक परिणाम होत असतो. परंतु अॅसिडिटीवर घरगुती उपयांनीही काही वेळात आराम मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत अॅसिडिटीचा होत असणाऱ्यांनी थंड दूध पियाल्याने पोटात आणि छातीत होणारी जळजळ कमी होते. 


आल्याचा तुकडा चावून खाल्यानंतर त्यावर गरम पाणी प्यायल्याने फायदा होतो.


केळ अॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो.


बडिशोप अॅसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जेवणानंतर बडिशोप खाल्याने अॅसिडिटीचा त्रास होत नाही. बडिशोप चावून किंवा चहा करुनही पिऊ शकतात.


आवळा सी विटॅमिनयुक्त असतो. आवळा पोटदुखी, गॅस, अॅसिडिटीमध्ये आराम देतो. आवळा पित्त कमी करत असून केसांचं आणि त्वचेचंही आरोग्य राखतो. 


टॉमेटोमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटॅमिन सी असतं. जे शरीरातील जीवाणूंना बाहेर काढतं. टोमॅटो आंबट असलं तरी शरीरात क्षारांचे प्रमाण वाढवतं. टोमॅटोच्या नियमित सेवनाने अॅसिडिटीची समस्या कमी होते. 


मसाल्यांमधील ओवा अतिशय गुणकारी आहे. अॅसिडिटीवरही ओवा फायदेशीर आहे. अॅसिडिटीचा झाल्यास ओवा आणि जीरं एकत्र भाजून घ्या. हे मिश्रण पाण्यात टाकून थोडी साखर टाकून पियाल्याने फायदा होतो.


गुळात मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम आतड्यांना मजबूत करण्याचं काम करतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित होते. रोज जेवणानंतर गुळ खाल्याने पित्त, अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.


वेलची खाल्याने अॅसिडिटीची समस्या दूर होते. एक ग्लास पाण्यात २ वेलची उकळून पाणी थंड करुन प्या. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास दूर होतो.


तुळशीची पानंही पित्ताच्या, अॅसिडिटीच्या त्रासावर गुणकारी आहेत. पित्ताचा, अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तुळशीची काही पानं चावून खा किंवा पानं पाण्यात उकळवून ते पाणी पिण्यानेही फायदा होतो. नियमीत तुळशीची पानं खाल्याने पित्ताचा त्रास कायमचा बरा होतो.