केसगळती रोखायला मदत करतील हे `4` घरगुती उपाय
आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती.
मुंबई : आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती. केसगळतीच्या समस्येवर वेळीच उपाय न केल्यास टक्कल पडण्याची शक्यता असते. परिणामी अनेकजण हेअर ट्रान्सप्लान्टसारखे पर्याय निवडतात. परंतू केसगळतीची समस्या वेळीच आटोक्यात ठेवायची असेल तर काही घरगुती उपायांकडे वेळीच लक्ष देणंही गरजेचे आहे. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत
कांद्याचा रस -
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे. दोन कांदे बारीक वाटून त्याचा रस टाळूवर लावा. त्यानंतर साधारण 1-2 तासांनी केस स्वच्छ धुवावेत. आठवडाभर 2-3 वेळेस हा प्रयोग केल्यानंतर तुम्हांला त्याच्या परिणाम दिसू शकेल.
ग्रीन टी -
केसगळती रोखण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टीच्या 1-2 बॅगा पाण्यात मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावावे. तासाभराने केस स्वच्छ धुवावेत. ग्रीन टी मधील अॅन्टी ऑक्सिडंट घटक केसांचे नुकसान टाळण्यास मदत करते. हेल्मेटच्या वापरामुळे खरंच केसगळती वाढते का? हे देखील नक्की जाणून घ्या
मसाज -
केसगळती रोखण्यासाठी नियमित मसाज करणेही पुरेसे आहे. केसांना ऑलिव्ह, खोबरेल,बदामाच्या तेलाने मसाज करणे फायदेशीर आहे. कोमट तेलाने मसाज करणं अत्यंत फायदेशीर आहे. तेल लावल्यानंतर सुमारे 4 तासांनी केस स्वच्छ धुवावेत.
कडुलिंब आणि कोरफड -
कडुलिंब आणि कोरफड यामुळे केसगळतीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. या मिश्रणामुळे केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.