थायरॉईड नियंत्रणात आणण्यासाठी हे घरगुती उपाय
वाचा थायरॉईडपासुन वाचण्याची उपाय
मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे. यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. आजच्या या धकाधकीच्या जीवनात 10 पैकी 4 लोकांना थायरॉईडची समस्या असते. यामध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक आहे. तर जाणून घ्या थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय तुम्ही करू शकता. पण कोणताही उपाय करण्याआधी सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय
- दोन चमचे तुळशीचा रस 12 चमचे ऐलोवेरा जूस यांचं मिश्रण करून प्या. या उपायामुळे तुमचं थायरॉईड नियंत्रणात राहिल.
- थायरॉईड असलेल्या महिलांनी खोबऱ्याचं तेल खाल्याने देखील थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- थायरॉईडने त्रासलेल्या लोकांना दही आणि दूधाचे अधिक सेवन करायला हवे. दूध आणि दह्यातील कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॉमिन्स थायरॉईडने ग्रासलेल्यांना विशेषतः पुरुषांना स्वस्थ ठेवण्यास मदत करतात.
थायरॉईडपासुन वाचण्याचे उपाय
- रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम केल्यास रक्ताभिसरण वाढून रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.
- मानसिक तणावामुळे थायरॉईडची समस्या उद्भवते, त्यामुळे जास्त तणाव घेऊ नये.
- थायरॉइड विकारांशी संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करावा.