मुंबई : सतत प्रदूषण, धूर, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेची पुरेशी काळजी न घेतल्यास यामधूनच ब्लॅकहेड्सचा त्रास बळावतो. नाकाजवळच्या भागामध्ये तेल ग्रंथी अधिक प्रमाणात असल्याने या भागात ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचा त्रास बळावतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅकहेड्स वेळेतच काढले गेले नाहीत तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामधूनच अ‍ॅक्ने वाढू शकतात. त्यामुळे ब्युटी ट्रीटमेंट घेण्याआधी तुम्ही घरच्या घरी काही उपायांनी ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करू शकता. या 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास


ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी उपाय 


ब्लॅकहेड्सचा त्रास वरचेवर जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा नक्की वाफ घ्या. स्टिमिंग म्हणजेच वाफ घेतल्याने त्वचा मोकळी होण्यास मदत होते. ती अधिक मुलायम होते. ब्लॅकहेड्स मोकळे करण्यास मदत होते.


दोन चमचे बेकिंग सोड्यामध्यए  थोडंसं पाणी मिसळून पेस्ट बनवा. चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा  स्वच्छ धुवावा. यामुळेही घरच्या घरी ब्लॅकहेड्सचा त्रास दूर होतो. 


चंदन पावडर पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. सोबतच चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी, ब्लॅकहेड्सची वाढ रोखण्यासाठी चंदनामुळे मदत होते. याकरिता चंदनाच्या पावडरमध्ये दूध, हळद  ब्लॅकहेड्सवर लावा. अर्धा तासाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. 


संत्र्याची साल सूर्यप्रकाशात सुकवून त्याची पावडर करा. यामध्ये  मध मिसळून ब्लॅकहेड्सवर लावा. अर्धा तासाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा. हा प्रयोग नियमित केल्याने अवघ्या काही दिवसातच ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.