Cracked Heels : थंडीत टाचांचीही समस्या गंभीर बनते. काहींच्या टाचा (Cracked Heels) खुप दुखायला लागतात, तर काहींच्या टाचांमध्ये भेगा पडल्या असल्यामुळे त्यामधून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे हिवाळ्यात टाचांना (Cracked Heels) भेगा पडल्याने लोकही खूप त्रासलेले असतात. यामध्ये महिलांचा जास्त समावेश असतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय या समस्येवर खुप प्रभावी असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे  ही वाचा : तुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार


हे घरगुती उपाय करा


थंडीत अनेकांना टांचांमध्ये (Cracked Heels) खुप वेदना होतात. काहींच्या टाचांमध्ये भेगा असल्यामुळे रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.


भेगा पडलेल्या टाचांपासून (Cracked Heels) मुक्त होण्यासाठी मेण देखील खूप प्रभावी आहे. त्यात दोन थेंब तेल मिसळा आणि रात्री मोजे घाला आणि सकाळी स्वच्छ करा. यामुळे तुमची फाटलेली टाच हळूहळू बरी होण्यास सुरुवात होईल.


तांदळाचे पीठ तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांपासून (Cracked Heels) आराम देण्यासाठी देखील प्रभावी आहे. तुम्हाला 2 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, त्यानंतर त्यावर 1 चमचा मध, 3-4 थेंब सफरचंदाचा व्हिनेगर आणि ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल टाकून मसाज करा.


भेगा पडलेल्या टाचांपासून (Cracked Heels) सुटका मिळवण्यासाठीही व्हॅसलीन प्रभावी आहे. तुम्हाला फक्त ते झोपण्यापूर्वी लावायचे आहे. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळू लागेल.


टाचांच्या भेगापासून (Cracked Heels) सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवून बसा, त्यानंतर टाचांना प्युमिस स्टोनने घासून घ्या, त्यानंतर बदाम तेल किंवा खोबरेल तेल गरम करून टाचांवर लावा.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)