डास खूप त्रास देताहेत, या घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा
Homemade Mosquito Trap: डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो.
Tips To keep Mosquito Away: हिवाळा सुरू झाला की बहुतेक घरांमध्ये पंखे चालणे बंद होतात. अशा स्थितीत सकाळी आणि रात्री डास जास्त चावतात. कधी कधी अशी परिस्थिती देखील येते की पंखा चालवल्याशिवाय झोप येत नाही. काही लोक डास दूर करण्यासाठी मच्छर अगरबत्ती वापरतात. पण डासांची कॉइल (Mosquito coil) आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे कारण त्यातून निघणारा धूर अनेक प्रकारच्या रसायनांनी भरलेला असतो. डासांच्या कॉइलच्या अतिवापरामुळे दम्यासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. पण डासांपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यांचा अवलंब केल्यानंतर डास तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.
मच्छर सापळा कसा बनवायचा
साखर, यीस्ट आणि पाणी वापरून मच्छर (mosquito) सापळा बनवू शकता.यासाठी प्रथम प्लास्टिकची बाटली घ्या आणि ती अर्धी कापून घ्या. आता अर्धवट कापलेल्या बाटलीच्या खालच्या भागात थोडेसे गरम पाणी भरा आणि नंतर त्यात साखर घाला. ते व्यवस्थित मिसळा आणि हे पाणी थंड झाल्यावर त्यात यीस्ट घाला. आता बाटलीचा वरचा अर्धा भाग कापून ठेवा आणि पाण्यावर उलटा ठेवा. हे करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की आपण बाटलीची टोपी उघडली आहे. या सापळ्यात डास आपोआप येऊन पडतील.
वाचा : रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
कापूर
डासांना घालवण्यासाठी तुम्ही कापूर वापरू शकता. यासाठी खोलीचा दरवाजा आणि खिडकी बंद करून कापूर जाळा. यानंतर तुम्हाला दिसेल की 30 मिनिटांत सर्व डास पळून गेले आहेत. तुम्ही पाण्यात कापूर टाकूनही ठेवू शकता. त्याच्या वासाने डासही पळून जातात.
पुदीना वापरा
जर तुमच्या घरात डासांनी दहशत निर्माण केली असेल तर तुम्ही पुदिना वापरू शकता. पुदिन्यापासून डास खूप दूर पळतात. त्यामुळे ते मॉस्किटो रिपेलेंटमध्येही वापरले जाते. तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पुदिन्याची पाने ठेवू शकता किंवा सर्वत्र पुदिन्याचे तेल शिंपडू शकता. यामुळे डासांपासूनही सुटका होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही.)