टॅनिंग दूर करण्याचे परिणामकारक असे ४ घरगुती उपाय!
उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
मुंबई : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. लवकच त्याचा प्रहार वाढले. मग त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतील. त्वचा टॅनिंगची समस्या तर अगदी सामान्य. यावर घरगुती उपाय केल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.
पाच चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घाला. हे मिश्रण अतिशय पातळ करु नका. हे मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
२ चमचा बेसनमध्ये चिमूटभर हळद घाला. त्यानंतर काही थेंब लिंबाचा रस आणि दूध घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावून काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.
मुलतानी मातीमध्ये चमचाभर कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर घाला. त्यात गुलाबजल घालून चांगली पेस्ट बनवा. चेहऱ्याला, मानेला हा पॅक लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा.
पपईचा गर आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावल्यानेही टॅनिंग दूर होते. हे मिश्रण ३० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.