मुंबई : चेहर्‍याचं एखादा तिळ ब्युटीमार्क असू शकतो. परंतू चेहर्‍यावर अधिक तीळ असल्यास किंवा त्यांची जागा चूकीची असल्यास ते खटकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरावरील तिळ काढून टाकण्यासाठी काही डरमेटोलॉजिक ट्रीटमेंट आहेत. परंतू घरगुती उपायांनीदेखील तिळ हटवले जाऊ शकतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय  -  


कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हांला नको असलेल्या तिळावर नियमित लावा.  


एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते. हळूहळू तीळ कमी होण्यास सुरूवात होईल.  


मध आणि  सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तिळ कमी होण्यास मदत होईल.  


कपभर अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करा. या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्‍यावरील तिळ कमी होण्यास मदत होईल. 


लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तिळावर लावा. त्यावर बॅन्डेज लावा. सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्यास तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.  


काही आल्याचे तुकडे ठेचून तिळाच्या जागी लावा. त्यावर कपडा बांधून झोपा. या उपायानेही तिळ कमी होण्यास मदत होते. 


व्हिटॅमिन सीची एक गोळी बारीक कुटा. रात्री ही पेस्ट तिळावर लावून, त्यावर बॅन्डेज लावून झोपा. 


व्हिनेगरचा वापर करूनदेखील तिळ हटवला जाऊ शकतो. सुरूवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा. कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर तिळावर लावा. 10 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.