मुंबई : गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद भावना आहे. पण हे जाणण्यासाठी स्त्रिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. संपूर्ण गर्भधारणेच्या काळात स्त्रीला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, गर्भधारणेदरम्यान जेव्हा बाळ पोटात वाढतं, तेव्हा स्त्रिच्या पोटावरील त्वचेवर ताण येतो. यामुळे, ओटीपोटाच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसतात. जर त्यांच्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर प्रसूतीनंतरही ते सहज जात नाहीत. मात्र काही नैसर्गिक उपायांमुळे हे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात. जाणून घ्या काही उपाय जे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करतात. 


  • एक चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा लिंबाच्या रसामध्ये मिसळा. हे पोटावर स्ट्रेच मार्क्सचा भागांवर लावा. त्यानंतर ते 10 ते 15 मिनिटे तसंच राहूद्या. हे आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा करा. लिंबूमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. बेकिंग सोडा एक नेचुरल स्किन एक्सफोलिएटर आहे. हे प्रभावित भागातून मृत पेशी काढून स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यास मदत होते.

  • हळद आणि चंदनाची पेस्ट स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी चंदन पाण्यासोबत घासून त्यात हळद घालून मिश्रण तयार करा. यानंतर, स्ट्रेच मार्क्सवर ही पेस्ट लावा. पेस्ट कोरडे झाल्यानंतर धुवा. असं रोज केल्याने स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर होऊ लागते.

  • स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी नारळाचे तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचं मालिश देखील खूप प्रभावी आहे. तेलाच्या नियमित मालिशने त्वचेत ओलावा पोहोचतो आणि त्वचेला पोषण मिळतं. यासाठी परंतु दिवसातून किमान दोनदा मालिश करणे आवश्यक आहे.

  • कोरफडीचं जेल देखील सुरकुत्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. हे पोटाच्या स्ट्रेच मार्क्स बरं करण्यासाठी देखील चांगले काम करतं. यासाठी कोरफडीच्या पानाची साल सोलून जेल स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि काही वेळ मसाज करा. असं केल्याने केल्याने आरामही मिळतो.