चेहऱ्यावर डाग आहेत ? करा हे घरगुती उपाय
चेहऱ्यावर मुरम असणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण याचे काळे डाग चेहऱ्यावर कायम राहील्याने चेहऱ्याची सुंदरता हिरावली जाते.
मुंबई : चेहऱ्यावर मुरम असणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण याचे काळे डाग चेहऱ्यावर कायम राहील्याने चेहऱ्याची सुंदरता हिरावली जाते. उन्हातून घराबाहेर पडणाऱ्यांना घामामुळे मुरम, पुरळच्या समस्येचा सामना करावा लागतो.
मुरम कमी करण्यासाठी हे करा
तळलेल्या रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाा
वेळेवर झोपण्याची सवय लावा
पाणी जास्त प्या ज्यामुळे शरीरास नको असेलेले घटक बाहेर जायला मदत होईल
घरगुती प्रयोग
लिंबू कापून चेहऱ्यावर घासल्याने चेहऱ्यावरील घाण दूर होईल. त्यातील अॅसिडिक गुणांमुळे मुरम निघायला आणि जखम भरून निघायला मदत होते.
मुरमांवर ३० मिनिटे मध लावा.
मुरमांवर बर्फाचा तुकडा हळूहळू रगडा.
अंड्याचा सफेद णभाग मधामध्ये मिक्स करुन चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा.