मुंबई : थंडीच्या मोसमात सर्दी किंवा घसादुखीमुळे लोक गरम पाण्याचे सेवन करतात. तसेच कोरोनामुळे अनेकांनी गरम पाणी पिण्यास जास्त सुरुवात केली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, जास्त गरम पाणी प्यायल्यानेही शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गरम पाण्याचा वापरही मर्यादेत आणि अनेक गोष्टी लक्षात ठेवूनच केला पाहिजे, अन्यथा तुम्ही ज्याचा औषध म्हणून वापरत करतायत, त्याचा उलटा परिणाम तुमच्या शरीरावर शकतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी, कोणत्या परिस्थितीत गरम पाणी पिऊ नये आणि कोणत्या परिस्थितीत हे पाणी शरीरासाठी चांगले आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला गरम पाण्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.


डिहायड्रेशन


अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, शरीरात 55-65 टक्के पाणी असते. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते शरीराला हायड्रेट करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. परंतु, गरम पाण्याच्या बाबतीत मात्र याचा परिणाम उलाटा होऊ शकतो. जर तुम्ही जास्त गरम पाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या येऊ शकते.


किडनीवर दबाव


शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम किडनी करते. परंतु, जेव्हा गरम पाण्याचा परिणाम किडनीवर होतो, त्यामुळे किडनीवर कामाचा ताण वाढतो आणि शरीराच्या इतर भागांवरही त्याचा प्रभाव वाढतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की गरम पाण्याचा किडनीवर परिणाम होऊ लागतो.


झोपेवर परिणाम


गरम पाण्याचा झोपेवरही परिणाम होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे. रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो. रात्री गरम पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तवाहिन्यांच्या पेशींवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी जास्त गरम पाणी पिऊ नका.


शरीराला अंतर्गत फायदे


जर जास्त गरम पाण्यामुळे तोंडात व्रण पडतात आणि तोंडात किरकोळ जळजळ होऊ शकते, तर शरीराच्या अंतर्गत अवयवांवर देखील त्याचा परिणाम होतो. सर्वात प्रभावित अवयव अन्ननलिका आणि पाचक प्रणाली आहेत, त्याच्या आतील आवरण हे खूप संवेदनशील असतात. त्यामुळे गरम पाण्याचे तापमान शरीराच्या तपमानापेक्षा जास्त असल्याने ते त्याला सहन करु शकत नाही. त्यामुळे गरम पाणी अशा प्रकारे तुमच्या शरीराचे नुकसान करु शकते.