Balanced Diet For Immunity: हिवाळ्यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते आणि त्यामुळे बरेचसे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे ह्या ऋतूत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. हिवाळ्यात सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखे आजार दूर ठेवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते. सकस आहाराद्वारे अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. 


सकस आहाराचे महत्त्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहाराची खूप गरज असते. हिवाळ्यात सकस आहार घेणे शरारीतील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. आरोग्यतज्ञ या आहारामध्ये हिवाळी ऋतूतील फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. संतुलित आहारामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडंट्स असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करायला हवा जेणेकरुन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.


इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी 'हे' करा


हिवाळ्यात ज्या फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते अशा फळांचे सेवन करण्याचे पोषणतज्ज्ञ डॉ. कनिका सचदेव सांगतात. संत्री, आवळा, पपई आणि स्ट्ऱ़ॉबेरीसारख्या फळांमधून भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिळते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते आपण हिवाळ्यात अशा फळांचे सेवन करायला हवे. त्याचबरोबर, गाजर, रताळू, पालक यांसारख्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरते. 


'या' पदार्थांचा नक्की समावेश करा


शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद, आलं, लसूण, मध, तुळशी असे अनेक आयुर्वेदिक आणि उष्णता वाढवण्याऱ्या पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते. आलं आणि मध एकत्र खाल्ल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते. हळदीचे दूध पिल्याने शरीरातील इन्फ्लेमेटरी प्रक्रिया कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 


मानसिक शांतता 


तज्ज्ञांच्या मते, मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योगा, प्राणायम, मेडिटेशन करा तसेच गाणी ऐकल्याने सुद्धा मानसिक शांतता मिळते. याव्यतिरीक्त, वेळोवेळी विश्रांती घ्या आणि सकारात्मक, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 


कपड्यांकडे विशेष लक्ष द्या


हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे घातली पाहिजेत. शरीराला थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मफलर, हातमोजे आणि बूटांचा वापर केला पाहिजे. यामुळे शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत होते. ऊबदार कपड्यांमुळे इंफेक्शन आणि आजारापासून दूर राहता येते. तसेच बदलत्या हवामानामुळे दुषित हवेचा किंवा धुळीचा त्रास होऊ शकतो. धुळीपासून संरक्षणासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग करा.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)