Benefits of skin steaming treatment: सध्याच्या काळात फेशियल स्टीमिंग हा सर्वांत लोकप्रिय डिटॉक्सिफाइंग ट्रीटमेंटपैकी एक आहे. ही ट्रीटमेंट घरी अगदी सहज केली जाऊ शकते. ग्लोइंग स्किनसाठी स्टीम बाथ मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, कारण तो त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवतो. यामुळे त्वचेवरील छिद्र उघडतात आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. फेशियल स्टीमिंग एंटी-एजिंगसाठीही खूप फायदेशीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्दी झाल्यास वाफ घेतांना गरम पाण्यात थोडं विक्स किंवा निलगिरी घातले तर नाक मोकळे होते. चेहऱ्यासाठी वाफ घ्यायची असेल तर गरम पाण्यात गवती चहा घालावा. गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे चेहऱ्यावर त्याची वाफ घेणे आरोग्यदायी ठरते. पाण्यामध्ये तुम्ही मिठ , लिंबू , ईसेन्शियल ऑईल्स घालून वाफ घेऊ शकतात. 


वाफ घेण्याचे ब्युटीशियनने सांगितले फायदे: 
 ब्युटीशियन नव्या सिंग यांनी सांगितले चेहर्‍यावर वाफ घेतल्याने त्वचेवरील खरखरीतपणा दूर होतो. ब्लॅकहेड्स आणि डेड स्किन सेल्सही निघून जाते. तसेच चेहऱ्यावरील तेलकटपणा  कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे चेहर्‍यावरील घाण बाहेर पडते, मुरूम कमी होतात. त्वचा हायड्रेट होऊन चमकदार होते.


स्किन स्टीमिंग प्रक्रिया:
त्वचेला क्लेंजरने मसाज करून स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेला कमीत कमी 10 मिनिटे वाफ द्या. वाफ घेतल्यानंतर चेहर्‍यावर 15 मिनिटांसाठी क्ले मास्क लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. स्क्रब म्हणून तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता. त्वचेला ग्लोइंग करण्यासाठी अॅलोवेरा जेल चेहर्‍यावर लावा. या प्रक्रियेला महिन्यातून 4-5 वेळा नक्की करून बघा आणि घरीच सुंदर आणि मऊ त्वचा होईल.


वाफ घेताना हे काळजी घावी: 
वाफ घेत असतं तर पाण्याचा जवळ आपला चेहरा जास्त नेऊ नये कारण पाणी खूप गरम असल्यानं तुमचं चेहरा भाजू शकतो. काही लोकांना गरम पाण्यामध्ये काही घातले  तर त्यामुळे ऍलर्जी येऊ शकते त्यामुळे आपल्या त्वचेला काय चालेल याचा विचार करुनच तुम्ही पाण्यात मिठ , लिंबू , ईसेन्शियल ऑईल्स ,विक्स , निलगिरी या गोष्टी घालून वाफ घ्यावी.   



स्किन स्टीमिंगचे परिणाम:
1. चेहर्‍यावर वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्र उघडतात आणि त्यात साचलेली घाण निघून त्वचा स्वच्छ होते.
2. वाफेमुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होतात, जे स्क्रब करताना सहज त्वचेत मिसळून जातात. 
3. गरम वाफ आणि घामामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्ताभिसरण वाढते. 
4.स्टीमिंगमुळे त्वचा हायड्रेट राहते, त्यामुळे चेहऱ्यामुळे तेलकटपणा दूर होतो आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते. 
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)