मुंबई : महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिपाळीचे दिवस त्रासदायक असले तरीही ती वयाच्या विशिष्ट टप्प्यावर महिलांसाठी फार आवश्यक असते. या काळात हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बिघाड होण्यामागे आहारदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतो. एका अभ्यासानुसार, ज्या महिलांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं त्यांच्यामध्ये मासिकपाळी वेळेआधी येण्याची शक्यता अधिक असते. 


संशोधकांचा दावा 


युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स या ब्रिटनमधील एका प्रयोगात 914   महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार ज्या महिलांच्या आहारात मासे, बींस यांचे सेवन अधिक असते त्यांच्यामध्ये मासिकपाळी उशिरा येते. 


काही तज्ञांच्या माहितीनुसार, मासिकपाळी ही केवळ आहारावर अवलंबून नसते.  आहारासोबतच इतर अनेक घटकांचा मासिकपाळीवर परिणाम होत असतो. 


आहार आणि मासिकपाळी 


स्टडी जर्नल ऑद एपिडिमीलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलांना त्यांच्या आहाराबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानुसार फळदार भाज्या अधिक खाणार्‍यांमध्ये मासिकपाळी उशिरा आल्याची दिसून येते. हा उशिर सुमारे एक ते दीड वर्षांचा असू शकतो. फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने मासिकपाळीमध्ये उशीर होऊ शकतो. 


कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे मुलींमध्ये एक ते दीड वर्ष आधी मासिकपाळी सुरू होते. 


संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारासोबतच महिलांचं वजन, प्रजनन क्षमता आणि एचआर्टी हार्मोन देखील मासिकपाळीवर प्रभावी ठरतात. अनुवंशिकतेचाही मासिकपाळीवर थेट  परिणाम होतो. 


हार्मोन्समध्ये चढउतार 


माश्याच्या तेलामध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळेही शरीरात अ‍ॅन्टिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. 


शरीरात सेक्स हार्मोन्सही प्रभावित होतात. यामुळे एस्ट्रोजनची पातळी वाढते. त्यामुळे मासिकपाळी प्रभावित होते. ती वेळेआधी येण्याची शक्यता वाढते. 


मासिकपाळी आणि आजाराचा धोका 


संशोधकांच्या अभ्यासानुसार ज्या महिलांमध्ये मासिकपाळी वेळेच्या आधी सुरू होते अशांमध्ये हाडांचे विकार, हृद्यविकारांचा धोका बळावतो. तर मासिकपाळी उशिरा सुरू झालेल्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता अधिक बळावते.