मुंबई : मधमाशांचं पोळ पाहिल्यानंतर काही लोकांच्या मनात धडकीच भरते. मधमाशीचं पोळ घराजवळ पाहिल्यानंतर त्याला हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचंही तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मग मधामाशी चावल्यानंतर नेमकं काय करावं? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. मग यावर खबरदारीचा उपाय म्हणून या सल्ला नक्की लक्षात ठेवा. 


मधमाधीचा डंख कधी ठरतो जीवघेणा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधमाधीचा डंख वेदनादायी असतो.मात्र काही लोकांसाठी तो जीवघेणा ठरतो. प्रामुख्याने अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनमुळे मधमाशीचा डंख झाल्यानंतर मृत्यू होऊ शकतो.  मधमाशीच्या नांगीची अ‍ॅलर्जी असणार्‍यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. anaphylactic shock मुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. 


या लक्षणांकडे दुर्लक्ष नको 


मधमाशीचा डंखानंतर शरीरावर तात्काळ काही रिकॅक्शन दिसून येतात. यामध्ये खालील लक्षणं आढळतात. 


तीव्र वेदना  
त्वचा पांढरी होणं
त्वचेवर रिअ‍ॅक्शन दिसणं
त्वचा लाल होणे
पुरळ येण 
अस्वस्थ्य वाटणं
तीव्र डोकेदुखी 
मळमळ, उलट्या 
पोटदुखी 
बेशुद्ध होणं
चक्कर येणं 
हृद्याचे डोके वर खाली होणं
रक्तदाब कमी होणं
धाप लागण


मधमाशी  चावल्यानंतर काय कराल ? 


प्रत्येक वेळेस मधमाशी चावल्यानंतर वैद्यकीय मदतीची गरज भासेलच असे नाही. मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. 


ट्विझरच्या (लहान चिमटा) मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. 


तो भाग साबणाने स्वच्छ करा. 


त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना आणि सूज कमी होँण्यास मदत होते. 


या प्रथमोपचारानंतरही त्रास वाढत असल्यास तत्काळ रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा. सूज वाढत असल्यास किंवा श्वास घेताना त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक आहे.