लंडन : सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये बेरोजगार लोकांच्या तुलनेत कमी पगार घेणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागत असल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आलीये. संशोधकांनी २००९ ते २०१० या दरम्यान ३५ ते ७५ वयोदरम्यानच्या १००० बेरोजगार व्यक्तींवर हा अभ्यास केला. 


तसेच पुढील काही वर्षे या व्यक्तींवर अभ्यास केला असता त्यांच्यात अधिक ताणतणाव तसेच इतर आरोग्याच्या समस्याही अधिक आढळल्या. हार्मोन्स आणि तणावासंबधित बायोमार्करच्या सहाय्याने ही तपासणी करण्यात आली होती. 


य़ावेळी बेरोजगार लोकांच्या तुलनेत ज्यांना कमी वेतन दिले जाते, तसेच ज्यांचे काम तितकेसे चांगले नाही अशा व्यक्तींमध्ये तणावाची पातळी उच्च होती.