मुंबई : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या भारतासह संपूर्ण जगात पसरतोय. तर एका अभ्यासात असं समोर आलंय की, या व्हेरिएंटने संक्रमित लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीबॉडीजची पातळी इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 11 पटीने वाढत आहे, ज्यामुळे लोकांना भविष्यातील कोरोनाच्या व्हेरिएंटपासून गंभीर आजार होण्यापासून रोखता येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को आणि बर्कले, यूएसए मधील शास्त्रज्ञांच्या एका टीममध्ये डॉ. जेनिफर रन यांचा समावेश होता. त्यांनी उंदीर आणि माणसांवर केलेल्या अभ्यासातून असा दावा केलाय की, जर एखाद्या व्यक्तीने लसीचा एकही डोस घेतला नाही आणि त्याला ओमायक्रॉन संसर्ग झाला तर त्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिकारशक्तीची पातळी वाढणार नाही. 


त्याच वेळी, ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ओमायक्रॉनच्या संसर्गानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.


अमेरिकेतील या अभ्यासातील इंटरनल मेडिसीन डॉ. परिणीता कौर यांनी माहिती दिली की, त्यांनी कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्ही व्हेरिएंटचे रूग्ण पाहिले होते. ज्यांना लस घेऊन कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यात गंभीर लक्षणं दिसून आली नाहीत कारण हायब्रिड इम्युनिटीमुळे कोरोनाशी लढण्यासाठी ते तयार होते.


डॉ कौर यांच्या मते, हायब्रिड इम्युनिटी हा संसर्गाशी लढण्यासाठी नेहमीच एक चांगला सोर्स आहे. तर ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ते आपल्यामध्ये नैसर्गिक इम्युनिटी असल्याने लस घेण्यास नकार देतायत, तर ही गोष्ट चूक आहे.