फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अनेक फळांमध्ये असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. लहान मुलं असो ज्येष्ठ नागरिक डॉक्टर असो किंवा आहारतज्ज्ञ फळांचं सेवन करण्यास सांगतात. दररोज एक सफरचंदचं सेवन म्हणजे डॉक्टरांपासून दूर असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचा घरात आपण फळं पाहतो. पण फळांचं सेवन करताना काही नियम आहेत. त्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर फळचं सेवन केल्यामुळे आपला फायदा नाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे फळांसंदर्भातील अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत. (How many fruits should be eaten a day eat 2 3 fruits together Get answers to all your questions from celebrity dietitians)


तज्ज्ञ म्हणतात की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, अलीकडेच डॉ. जुशिया भाटिया सरीन यांनी त्यांच्या नवीनतम पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांच्याशी संवाद साधला. डॉ सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांनी फळं आणि ते खाण्याची योग्य पद्धतीबद्दल सांगितलंय. तसंच उत्तम आरोग्यासाठी फळं कशी खावीत याबाबत त्यांनी आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. 


प्रश्न 1 - एका वेळी किती फळं खाणे योग्य आहे?


आहारतज्ज्ञ सोनिया सांगतात की, 'एकावेळी 200 ग्रॅम फळं खाणं आरोग्यासाठी उत्तम असतात. तुम्ही एकाच वेळी अनेक फळं खाल्ल्यास, त्यामुळे फळांचे ग्लायसेमिक लोड (GL) वाढतं, जे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.


प्रश्न 2 - एका दिवसात किती फळं खावीत?


'RDA म्हणजेच शिफारस केलेल्या आहार भत्त्यानुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 फळं खाणं योग्य आहे.'


प्रश्न 3 - मिक्स फूड खाणे योग्य आहे का?


एकत्र अनेक फळांचं सेवन करु नये. आहारतज्ज्ञ म्हणतात की, चांगले फायदे मिळवण्यासाठी आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यासाठी एका वेळी एकच फळ खावे.


प्रश्न  4- जेवण झाल्यानंतर फळं खाणं योग्य आहे का?


या प्रश्नाबाबत आहारतज्ज्ञ सांगतात की, संतुलित आहार घेतल्यानंतर फळं खाऊ नयेत. यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. त्याशिवाय अन्न खाल्ल्यानंतर फळं खाल्ल्याने त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत जेवणानंतर फळं खाणं नेहमी टाळावे.


प्रश्न 5 - मग फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?


सोनिया नारंग यांच्या मते, तुम्ही दुपारी किंवा जेवण करण्यापूर्वी फळांचं सेवन करू शकता.


अशा प्रकारे, काही खास गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी योग्यरित्या घेऊ शकता. 


Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)