उन्हाळ्याच्या दिवसांत किती प्रमाण पाणी प्यायलं पाहिजे? पहा तज्ज्ञांचा सल्ला
जाणून घेऊया सध्याच्या दिवसांमध्ये किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.
मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशा दिवसांत तुम्ही जास्त पाणी प्यायलं पाहिजे असा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. मात्र पाणी नेमकं किती प्यायचं? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेळोवेळी पाणी प्यायलं पाहिजे. आज जाणून घेऊया सध्याच्या दिवसांमध्ये किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.
आहारतज्ज्ञ डॉक्टर रंजना सिंह यांच्या मताप्रमाणे, उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक तहान असते. मात्र कामामुळे किंवा व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक लोकं पाणी पिणं विसरून जातात. मात्र असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
डॉ. सिंह यांनी सांगितलं की, एका व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी एका दिवसात 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा त्वरित पाणी प्यायलं पाहिजे.
पाणी पिण्याचे फायदे
शरीराचं तापमान नियंत्रित होण्यास मदत
वजन कमी करण्यास मदत होते
पाण्यामुळे त्वचा चांगली राहते
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
पुरेसं पाणी प्यायल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.
हाडं आणि स्नायूंना शक्ती मजबूती मिळते.