मुंबई : मुलींना लांबसडक आणि काळेभोर केस पसंत असतात. केसांच्या आरोग्यासाठी आणि समस्येनुसार वेगवेगळे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. मात्र केमिकलयुक्त शाम्पूचा अतिवापर आणि सतत शाम्पू बदलल्याने केसात कोंडा होण्याचा त्रास बळावतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसात कोंडा होणं हे सौंदर्याच्या समस्या वाढवण्यासही कारणीभूत ठरते. म्हणून वेळीच त्यावर घरगुती उपायांनी मात करणं अवाश्यक आहे. केसांमधील कोंडा दूर करण्यासोबतच त्यांना चमकदार, मजबूत करण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे.  


कसा कराल बटाट्याचा वापर ?


घनदाट आणि मुलायम केसांसाठी 2-3 बटाटे किसा. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअर पॅक सुकू द्यावा. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत.  


कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांना मूळासकट लावा. 2 तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवावेत. आठवडा भरात 2-3 वेळेस हा प्रयोग करा. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो.  


केस लांब वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हा पॅक केसांवर लावा. त्यानंतर पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे दीर्घकाळ केसांचं सौंदर्य टिकायला मदत होते.