मुंबई : उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. ज्यामुळे आरोग्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. शिवाय उन्हाळ्यात दिवसभर फिरल्यामुळे, घाम येणे, खाज सुटणे यासगळ्या गोष्टींच्या समस्या देखील उद्भवू लागतात. ज्यामुळे उन्हाळ्यात अंघोळ करताना देखील काळजी घेणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यात तुमचे शरीर फ्रेश राहीले पाहिजे, जेणे करुन तुम्हाला शरीर किंवा त्वचेशी संबंधीत कोणत्या ही समस्या येणार नाही. उन्हाळ्यात आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी याचे काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंघोळ करताना आपण सर्वजण आपली त्वचा पूर्णपणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. केवळ घाम आणि धूळच नाही तर त्वचेच्या मृत पेशी देखील यावेळी स्वच्छ होतात, परंतु तरीही आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या त्वचेवर संसर्ग होतो. त्यामुळे तुम्ही खालील पर्यायांचा वापर करा.


टॅल्कम पावडरचा वापर


उन्हाळ्यात आपल्याला सर्वात मोठी समस्या भेडसावत असते ती म्हणजे घाम येणे, जे ऍलर्जी, रॅशेस आणि खाज येण्याचे प्रमुख कारण असू शकते. तुमच्या जांगा, काख आणि खाजगी भाग यांसारख्या संवेदनशील भागांची काळजी घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तो भाग स्वच्छ, कोरडा आणि मॉइश्चराइज्ड असल्याची खात्री करणे.


तुम्ही शॉवरमधून बाहेर पडताच, जास्त काळ ताजेपणा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या जांगेला, काखेत किंवा प्रायव्हेट पार्टजवळ  टॅल्कम पावडर वापरू शकता.


तुमच्या घामाच्या ग्रंथी तुमच्या शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी जास्त वेळ काम करत असल्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या या भागातून वास येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावडर याला कमी करण्यासाठी मदत करेल.


स्वच्छतेची काळजी घ्या


महिलांनी त्यांच्या स्तनाची आणि खाजगी स्वच्छता याकडे उन्हाळ्यात पूर्ण लक्ष दिले पाहिजे. आंघोळीनंतर, टॉवेलने शरीर स्वच्छ करताना, स्तनाचा खालचा भाग आणि स्तनाचा मध्य भाग पूर्णपणे कोरडा करा. हे असे भाग आहेत, जेथे घामामुळे जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते.


त्वचा स्वच्छ ठेवा


उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे शेव्हिंग करताना काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शेव्हिंग करण्यापूर्वी आपली त्वचा चांगली हायड्रेट करा. त्वचेवर बदामाच्या तेलाचा मसाज, क्रीम मसाज किंवा लोशन मसाज करा.


सैल कपडे घाला


उन्हाळ्यात सैल कपडे घालण्यास विसरू नका आणि त्वचेला थोडी हवा मिळू द्या. तसेच खाजगी भाग स्वच्छ करण्यासाठी वेगळा छोटा टॉवेल किंवा स्वच्छ सुती कापड ठेवा. याने संपूर्ण भाग पूर्णपणे पुसून टाका, नंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा आणि त्यानंतरच आतील कपडे घाला.