मुंबई : उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल अनेकांमध्ये दिसून येते. केवळ वयस्कर व्यक्ती नव्हे तर सध्या तरूणांमध्येही ही समस्या दिसून येते. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरही नेहमी रक्तदाब म्हणजेच बीपी तपासण्याचा सल्ला देत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या लोकांच्या घरीच बीपी तपासण्याचं मशीन असतं. ज्यामाध्यमातून आपण घरच्या घरीच ब्लड प्रेशर तपासू शकतो. मात्र घरच्या घरी बीपी तपासताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. योग्य ती काळजी न घेतल्यास रक्तदाबाची योग्य पातळी कळू शकत नाही.


घरी बीपी कसा तपासावा?


डॉ. अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्याप्रमाणे, चुकीच्या पद्धतीने बीपी तपासल्यास रिंडींग चुकीचं मिळू शकतं. यामुळे आपण अधिकच घाबरून जाऊ शकतो. त्यामुळे घरी बीपी चेक करताना काही खास गोष्टींचं पालन केलं पहिजे.


  • पहिल्यांदा बीपी मॉनिटर योग्य पद्धतीने काम करतंय का हे पहा.

  • बीपीचं रिडींग घेण्यापूर्वी तुम्ही किमान 10 मिनिटं आरामात शांत बसलं पाहिजे. चालून किंवा धावून आल्यानंतर बीपी तपासू नये

  • बीपी तपासण्यापूर्वी नेहमी डाव्या हाताचा वापर करावा. यावेळी तो पट्टा कपड्यावर नव्हे तर थेट त्वचेवर लावावा.

  • तसंच खोकणं, शिंकणं यामुळे बीपीचं रिडींग चुकीचं होऊ शकतं. जर तुम्हाला खोकला किंवा शिंका येत असेल तर 10 मिनिटांनंतर तुमचा बीपी पुन्हा तपासा.