Ghee Purity Check : `या` पाच पद्धतींनी ओळखा तुमचं तूप अस्सल की बनावट
Real Ghee test at home : तुपाचा असलेपणा ओळखण्यासाठी एका चमचा तूप घ्या आणि एका ग्लास पाण्यात ते विरघळून घ्या जर तुमचं तूप पाण्याच्या वर तरंगू लागलं तर समजा...
Ghee Purity Check Tricks: सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. अश्यात स्निग्ध पदार्थांचं सेवन केलं जातं, कडाक्याच्या थंडीत हाडांचं दुखणं डोकं वर काढतं.शरीरातील झीज भरून काढण्यासाठी तीळ, तूप असे पदार्थ खाण्याचा सल्ला थंडीमध्ये दिला जातो. थंडीतच नाही तर एकूणच तुपाचं सेवन शरीरासाठी खूप फायद्याचं असत.
पूर्वी तूप लोणी घरीच बनवलं जायचं पण आजकाल वेळेअभावी आपण बाजारातूनच तूप खरेदी करतो वापरल्यावर आपल्याला कळतं की आपण खात असलेलं तूप हे ओरिजिनल नाहीये. त्यात डालडा किंवा इतर तत्सम पदार्थाची भेसळ keli आहे. पण काय करणार आपला नाईलाज असतो. बऱ्याचदा तर तुपातला भेसळपानं आपल्याला ओळखणं कठीण होऊन बसत. मग अश्यावेळी आपण खात असलेलं तूप असली आहे कि भेसळयुक्त हे कास जाणून घ्यायचं हे आपण आज जाणून घेऊया. (identified Fake ghee by these four methods)
प्रत्यक्षात डेअरी उत्पादकांकडून विकल्या जाणाऱ्या तुपासह नामांकित ब्रँडच्या तुपात भेसळ होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत खरे आणि भेसळयुक्त तूप कसे ओळखायचे, हे कळत नाही. खरं आहे ना, आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त तूप ओळखण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत.
कशी तपासाल तुपातील शुद्धता? (How to check adultrated ghee)
तुपाला चांगलं गरम करा, जर तूप लगेच वितळलं आणि त्याचा रंग बदलून तपकिरी झाला तर तुमचं तूप शुद्ध आहे. जर तुमच्या गरम केलेल्या तुपाचा रंग पिवळा झाला तर त्यामध्ये भेसळ आहे.
पाणी सांगेल तुमचं तूप असली कि नकली
तुपाचा असलेपणा ओळखण्यासाठी एका चमचा तूप घ्या आणि एका ग्लास पाण्यात ते विरघळून घ्या जर तुमचं तूप पाण्याच्या वर तरंगू लागलं तर समजा तूप असली आहे आणि पाण्याच्या तळाशी जाऊन बसलं तर ते तूप नकली आहे हे समजून जा.
तळहातावर घासून पहा
थोडासं तूप घेऊन ते तळहातावर घासून पहा जर ते तळहातावर विरघळलंतर ते तूप असली शुद्ध आहे मात्र ते हातावर तसेच राहील तर ते तूप शुद्ध नाही.
आयोडीन आणि साखर
एक चमचा तुपात चार ते पाच थेंब आयोडिन मिसळा. जर रंग निळा झाला तर त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याची भेसळ आहे.
एक चमचा तुपात एक चमचा हायड्रोक्रोलिक ऍसिड आणि चिमूटभर साखर मिसळा. जर रंग लाल झाला तर यामध्ये डालड्याची भेसळ आहे.
अशुद्ध तूप खाल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मुख्यतः हृदयसंबंधी आजार बळावण्याची शक्यता अधिक असते.
अशुद्ध तूप खाण्याचे परिणाम
भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने लिव्हर देखील खराब होऊ शकतं
भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं
भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाल्ल्याने मेंदूला सूजही येऊ शकते.
भेसळयुक्त किंवा अशुद्ध खाल्ल्याने पोट बिघडू शकतं, गॅस होऊ शकतो
भेसळयुक्त फॅट्स मिश्रित तुपाने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं
(Disclaimer: सदर लेख हा केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. बातमीतील सत्य असत्यतेबाबत zee24taas पुष्टी करत नाही. सामान्य आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )