Remedies for Dark Neck: जन्माला येताना सर्वच सुंदर म्हणून जन्माला येतात. कालांतराने बाह्य गोष्टी आपल्या सौंदर्यात बाधा आणण्याचं कामं करतात. काहीवेळा आपली बदलती जीवनशैली, प्रदूषण या सर्वांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो आणि त्वचा काळवंडू लागते. खराब दिसू लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला वर्गात तर सुंदर दिसण्यासाठी प्रचंड हुरूपात असते. यासाठी पार्लरमध्ये जाणं असो किंवा मग वेगवेगळे DIY वापरून सुंदर मी होणार, असं म्हणत अनेकजण घरच्या घरी, घरातल्याच साहित्यानं सौंदर्य आणखी खुलवण्याचं काम करतात. पण बऱ्याचदा काही गोष्टी सौंदर्यात बाधा आणतात . त्यापैकी एक गोष्ट म्हणजे काळवंडलेली मान, हाताचे कोपरे आणि ढोपरांवरचा काळेपणा ...काही जणांची मान फारच काळी झालेली असते, तर काहीजणांच्या हाताचा कोपरा काळी पडतो. तर ढोपरेसुद्धा काळवंडलेले असतात. यासाठी बरेच प्रयत्न केले जातात पण त्याचा काहीच परिणाम होतं नाही. (Beauty hacks)


(Neck) मान, ढोपरे आणि कोपरे  नियमित स्वच्छ न केल्यास काळवंडण्यास सुरुवात होते. यासाठी सध्या बाजारात अनेक स्क्रब आणि इतर साहित्य उपलब्ध आहेत. पण, त्यानंही काहीजणांना फरक पडत नाही. अशावेळी मग घरच्या घरी असणाऱ्या साहित्याकडे मोर्चा वळवला जातो. बऱ्याचदा काही घरगुती उपाय अनपेक्षित परिणाम दाखवतात. (beauty tips)


 तांदळाचा वापर


सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही काळवंडलेपणा आणि टॅन (tan) जमा होतो. यासाठी तांदळाचं पाणी आणि तांदळाची पेस्ट बरीच मदत करते. 


कशी स्वच्छ कराल मान कोपरे आणि ढोपरे ? (how to clean नेक, knee)


(Rice Water) तांदळापासून मान स्वच्छ करण्यासाठी झोपण्यापूर्वी तांदूळ पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर ते वाटून घ्या. या (Rice Paste) तांदळाच्या पेस्टमध्ये 1 विटामिन-ई कॅप्सूल आणि 1 चमचा कॉफी  (coffee) मिसळा. (remedies for dark tan नेक, do this to remove black patch )


हे मिश्रण मानेवर लावा आणि 10 मिनिटं ठेवा, त्यानंतर धुवून स्वच्छ करा. यानंतर मानेवर हलक्या हातानं moisturizer लावा. असं केल्यास मानेचा काळवंडलेपणा कमी होईल. 


या गोष्टींची काळजी घ्या (precautions)


एक गोष्ट लक्षात घ्या, की हे मिश्रण मानेवर जोरजोरात चोळू नका. असं केल्यास मानेवरील त्वचेला इजा पोहोचेल. हे मिश्रण मानेवर जास्त वेळ सुकून देऊ नका. (remedies for dark tan neck do this to remove black patch )


शिवाय केसांच्या (Hairs) संपर्कातही हे मिश्रण न आलेलंच बरं. कारण ते केसात अडकल्यास काढताना बऱ्याच अडचणी येतात.