Stop Overthinking :  कोणत्याही विषयाचा गरजेपेक्षा जास्त विचार करणे याला ओव्हरथिकिंग म्हणतात. महत्त्वाच म्हणजे ही एक नकारात्मक विचार आहे. आपल्या शारिरीक मानसिक आरोग्यासाठी ही अतिशय हानिकारक गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाला कळतंय की, एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा आपण जास्त विचार करतोय. हा विचार करणे थांबवायला पाहिजे. कारण कधी कधी या गोष्टी आपल्याला त्या नकारात्मक विचारांच्या जाळ्यात ओढून घेतात. या नकारात्मक विचारांना आपण कसे कंट्रोल करू शकतो, हे समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. पुढील 5 सवयींनी तुम्ही ओव्हरथिकिंगवर कंट्रोल करू शकता. 


स्वतःला ठेवा व्यस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही देखील ओव्हरथिकिंगचे शिकार असाल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की, स्वतःला आवडीच्या कामांमध्ये व्यस्त ठेवा. रिकाम डोकं शैतानाचं घर असं म्हटलं जातं, हे काही चुकीचं नाही. रिकाम डोकं असेल तर असंख्य गोष्टी आणि खास करून नकारात्मक गोष्टी डोक्यात येतात. 


मोठा श्वास घ्या 


एखाद्या वेळेस आपण जास्त विचार करत असू तेव्हा स्वतःला लगेच थांबवा आणि मोठा श्वास घ्या. आपले विचार डोक्यातून थांबवण्याकरता शांत होणे गरजेचे आहे. तुम्ही श्वासावर अंतर ठेवले तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. 5 ते 10 मिनिटे शांत राहून श्वासावर लक्ष केंद्रीत केल्यास तुम्हाला याची जाणीव होईल. 


ध्यान करा 


ओव्हरथिंकिंगपासून वाचण्याकरता ध्यान धारणा किंवा योगाभ्यास तुम्हाला मदत करतील. मनातील आणि शरीरातील नकारात्मक विचार कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. दिवसातून 10 ते 20 मिनिटे योग साधना केल्यामुळे ओव्हरथिकिंगपासून वाचू शकता. 


सेल्फ अवेयरनेस गरजेचा 


तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पकडून राहत असाल तर हा स्वभाव सर्वात अगोदर बदलणे गरजेचे आहे. ओव्हर थिकिंगचे हे सर्वात मोठे कारण आहे. काही गोष्टी विसरून जाणे किंवा दुर्लक्ष करणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टी तुमच्या यशापुढे नगण्य आहेत. यामुळे ओव्हरथिकिंग टाळाल.


एकटेपण टाळू नका 


तुम्ही देखील ओव्हरथिकिंगचे शिकार असाल तर स्वतः एकटे राहणे टाळा. कुटुंबासोबत राहा किंवा माणसात राहणं पसंत करा. कारण एकटेपणा तुम्हाला हैराण करेल.