मुंबई : अनेकांना रात्रीत झोपेत पायाची नस एकमेकांवर चढण्याचा त्रास जाणवतो. एखादी नस एकमेकांवर चढल्यानंतर पायामध्ये असह्य वेदना जाणवतात. 2-5 मिनिटं हा त्रास जाणवत असला तरीही वेदना मात्र खूपवेळ जाणवतात. पायदुखीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवा. 


का चढते एकमेकांवर नस ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरिया, डाईयुरेटिक, मधूमेह, डिहायड्रेशन, अल्होहलचे अतिसेवन, थकवा, पार्किनसन्स असे आजार असणार्‍यांमध्ये नस एकमेकांवर चढते. यासोबतच रक्तदाबाचा त्रास किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही पायांवरील नस एकमेकांवर चढते. 


वेदना कमी करण्यासाठी काय कराल? 


पायात गोळा आल्यासारखा जाणवल्यास लगेजच हालचा करा. थोडा वेळ फेरफटका मारा. 


उभं राहून हळूहळू हलवा. 


उभं राहून किंवा बसून खेचल्या गेलेल्या भागाला मोकळं करा. 


बसल्या जागी पाऊल घोट्याच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. काहीवेळ  या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. 


खूप तीव्र वेदना जाणवत असल्यास पायाखाली एखादी मोठी उशी ठेवा.