ब्रेकअपनंतर Depression येतंय? तर या 4 टिप्स करा फॉलो
सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता आपल्या Heart Break दु: ख कसं संपवायचं, चला तर जाणून घेऊया टिप्स
मुंबई : ब्रेकअप म्हणजे कोणात्याही व्यक्तीला नको असलेला विषय आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ही वेळ नक्की येते जिथे कधी कधी ब्रेकअपला टाळणे अशक्य होते. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासोबत फसवणूक झाली असेल आणि त्या गोष्टीचा मग आयुष्यावर परिणाम झाला असेल. कधी काळी आपण एखाद्या व्यक्तीला आपला जीवनसाथी मानत होतो आणि आता आपल्या आयुष्यात ती व्यक्ती नाही याचं दु: ख तर प्रत्येकाला असतं. अखेर काही कारणांमुळे रिलेशनशिप हे संपवण्याचा निर्णय दोघांनपैकी एक व्यक्ती घेते. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता आपल्या Heart Break दु: ख कसं संपवायचं.
आणखी वाचा : 'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी यंदाचं रक्षाबंधन म्हणजे सुवर्णक्षण; जाणून घ्या तुम्हाला होणार का याचा फायदा
आपला भूतकाळ आपल्याला बऱ्याच सतावत असतो. इतकचं काय तर आपला फोन वाजला की आपण लगेच हा विचार करतो की आपल्या Ex चा फोन आला आहे. एवढंच काय तर तो किंवा ती आपल्या आयुष्यात परत येईल आणि सगळ्या गोष्टी पुन्हा आधीसारख्या होतील, पण शेवटी तुम्ही Accept करतात की तो किंवा ती आता परत येणार नाही. जितक्या लवकर तुम्ही हे सत्य स्विकाराल तितक्या लवकर तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्यास मदत होते.
आणखी वाचा : अचानक प्रकृती बिघडल्यामुळं अभिनेत्री रातोरात रुग्णालयात दाखल; चेहऱ्याला सूज, आवाजही ओळखता येईना अशी अवस्था...
तुम्ही Ex ला फोन करणं किंवा मग मेसेजवर ब्लॉक करू शकतात. परंतु Ex सोबत असलेल्या आपल्या काही गोड आठवणी विसरणं खूप कठीण जात? ब्रेकअपनंतर हे सर्वात मोठे आव्हान असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या Ex वर ब्रेकअप केल्यामुळे रागावून राहणे योग्य नाही. ज्या गोष्टी पाहिल्यावर तुम्हाला Ex ची आठवण येते त्या सगळ्या गोष्टी नष्ट करणे किंवा मग हळूहळू मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जात होता तिथं जाणं टाळा.
आणखी वाचा : सुनिधी चौहानविरोधात शिवसेनेची तक्रार; पाकिस्तानशी का जोडलं जातंय नाव?
ब्रेकअपनंतर, तुमच्या अवतीभवतीचे लोक तुम्हाला डिप्रेशनवर मात करण्यावर मदत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जर तुमचे आणि तुमच्या Ex चे कॉमन फ्रेन्डस असतील तर मात्र तुम्ही त्यांना भेटण टाळायला हवे. कारण बोलता बोलता का होईना त्यांच्या किंवा तुमच्या तोंडातून Ex चं नाव निघेल. अनेकदा जेव्हा तुम्ही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही कुटुंब आणि मित्रांना कमी महत्त्व देऊ लागता. ब्रेकअपनंतर त्या चुका सुधारा आणि तुमच्या मित्रांना खूप वेळ द्या.
आणखी वाचा : Rakshabandhan Video: भाऊ नाही म्हणून 'ही' अभिनेत्री रिक्षावाल्यांना बांधतेय राखी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. आपल्या Ex ला विसरण्यासाठी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये येणं हा काय त्यावरचा उपाय नाही. आयुष्यात पुढे जाताना करिअरसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्या ज्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरतील, ज्या अडचणी येतात त्यांना स्वीकारून आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करा. भूतकाळातील चुकांमधून सगळ्या गोष्टी शिकूत रहा. त्यामुळे काही काळात तुम्हाला स्वतःला वाटेल की ज्या रिलेशनशिपला तुम्ही इतकं महत्त्व देत होतात, त्या रिलेशनशिपला तितकं महत्त्व देण्याची गरज नव्हती. तुमचा ब्रेकअप होणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरलं.