'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी यंदाचं रक्षाबंधन म्हणजे सुवर्णक्षण; जाणून घ्या तुम्हाला होणार का याचा फायदा

जाणून घ्या याा 5 राशींविषयी...

Updated: Aug 11, 2022, 11:30 AM IST
'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी यंदाचं रक्षाबंधन म्हणजे सुवर्णक्षण; जाणून घ्या तुम्हाला होणार का याचा फायदा title=

मुंबई : Mangal Gochar before Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते भावा-बहिणीचं नातं आणि लहानपणीच्या आठवणी... यंदाचं रक्षाबंधन ही या 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस घेऊन येणार आहे. या लोकांसाठी 14 ऑक्टोबरपर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. वास्तविक, रक्षाबंधनापासून मंगळ ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. मंगळ करत असलेल्या गोचरचा या 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत भरपूर पैसा आणि प्रगती होईल.

आणखी वाचा : Celebrity Phobia : कोणाला पंख्याची तर कोणाला वाटते फळांची भीती; पाहा सेलिब्रिटींचे चक्रावणार Phobia

वृषभ (Taurus) : मंगळाचं गोचर फक्त वृषभ राशीत होत असून या राशीच्या लोकांसाठी ते खूप शुभ असणार आहे. शत्रूवर विजय मिळेल. उत्पन्न वाढण्याची खात्री आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. विवाह निश्चित होऊ शकतो.

सिंह (Leo) : मंगळाचं गोचर सिंह राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. नशिबाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आणि तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. वाढत्या धैर्यानं आणि सामर्थ्यानं, प्रत्येक अडथळ्यावर सहज मात कराल.

आणखी वाचा : Rakshabandhan Video: भाऊ नाही म्हणून 'ही' अभिनेत्री रिक्षावाल्यांना बांधतेय राखी

 

कर्क (Cancer) : मंगळाचं गोचर कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. आतापर्यंत रखडलेली कामं वेगानं मार्गी लागतील. नोकरीत प्रमोशन मिळेल. उत्पन्न वाढेल. हातात पुरेसा पैसा आल्याचा आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. स्पर्धेत यश मिळेल.

तूळ (Libra) : मंगळाच्या गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होईल. रखडलेली कामे वेगानं पूर्ण होतील. जीवनात अचानक बदल घडून येतील. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. विवाह निश्चित होऊ शकतो.

आणखी वाचा : Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी

कुंभ (Aquarius) : मंगळाच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये आनंद येईल. जीवनात प्रेम वाढेल आणि त्याची सुखद अनुभूती तुम्हाला आनंद देईल. नवीन घर-गाडी खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)