मुंबई : पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्‍या महिलांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याची शक्यता अधिक असते असे काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टद्वारा जाहीर करण्यात आले होते. नव्या जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारतामध्ये दर पाच पैकी एका महिलेत पीसीओएसचा त्रास बळावल्याचे दिसून आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीसीओएसचा त्रास हा केवळ महिलांच्या मासिकपाळीच्या समस्येपुरता मर्यादीत नाही. मासिकपाळीसोबतच स्त्रियांमध्ये या आजारातून इतरही समस्या वाढण्याचा धोका अधिक आहे.  


कोणकोणत्या आजारांचा धोका बळावतोय ? 


पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस) ही एक सार्वजनिक स्वास्थ्य समस्या आहे. त्यामुळे त्याचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचे आहे. यामधून महिलांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉलची पातळी वाढणं, नैराश्य वाढणं, स्लिप  अ‍ॅप्निया, हृद्यविकार, मधुमेह, एंडोमेट्रियल, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत आहे. 


पीसीओएसचा त्रास असणार्‍यांमध्ये इंसुलिनची पातळी आणि कार्य बिघडण्यासही कारणीभूत ठरत आहे. यामधून वजन वाढणं, वंध्यत्त्व, चेहर्‍यावर अ‍ॅक्ने वाढणं, अनावश्यक केस वाढणं, डोकेदुखी, मूड स्विंग, झोपेचे विकार बळावतात. 


आहारत करा बदल 


महिलांचा आहारात ब्रोकोली, फ्लॉवर, पालक यासरखे फायबरचं प्रमाण अधिक असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. बदाम, अक्रोड, ओमेगा आणि फॅटी अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करा. 


दोन वेळेस भरपूर खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने पाच वेळेस खाण्याची सवय लावा. यामुळे मेटॅबॉलिझमचं कार्य उत्तम राहते. नियमित अर्धा तास व्यायाम करा. 


धुम्रपान, मद्यपानासारख्या व्यसनांपासून दूर रहा.