मुंबई : आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे, झोपण्याच्या, जीवनशैलीत  झालेल्या बदलांमुळे अनेकजणांमध्ये अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. अ‍ॅसिडीटीचा त्रास टाळण्यासाठी वारंवार अ‍ॅन्टासिड घेणं फायदेशीर नाही. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच काही घरगुती उपायांनीही पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. 


अ‍ॅसिडीटीच्या समस्येवर घरगुती उपाय - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी जेवताना घाई करणं टाळा. पटापटा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. परिणामी पोटात गॅस होणं, अपचन होणं हा त्रास संभावतो. 


रात्री झोपण्यापूर्वी गूळ चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. गुळातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स अपचनाचा त्रास कमी करण्यास मदत करतात. 


जेवणानंतर बडीशेप चघळल्यानेही पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. पचनसंस्थेतील सूज कमी होते. पित्ताचा त्रास कमी होतो.  


रात्री झोपण्यापूर्वी दूधात मध मिसळून प्यायल्याने त्रास कमी होतो. 


सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पित्तचा त्रास कमी होतो. या उपायांसोबतच जलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय