उच्च रक्तदाबाच्या त्रासाला कसं दूर ठेवाल?
हायपरटेन्शनला प्रतिबंध आणि त्यावर उपचार करण्यासाठी खालील गोष्टी पाळा
मुंबई : हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर आजार मानला जातो. म्हणून त्याला द सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं. कारण उच्च रक्तदाबाची लक्षणं ही बराच काळ लक्षात येत नाहीत. काहीवेळा रक्तदाब जरी वाढला तरी रूग्णाला ते जाणवत नाही. यामुळेच बऱ्याच रूग्णांना आपल्याला उच्चरक्तदाबाचा त्रास आहे हे लक्षात येत नाही.
हायपरटेन्शनला प्रतिबंध आणि त्यावर उपचार करण्यासाठी खालील गोष्टी पाळा
व्यायाम
आठवड्यातील दिवस जवळपास पाऊणतास किंवा तासभार एरोबिक पद्धतीचा (aerobic exercise) व्यायाम करावा.
वजन
लठ्ठपणा म्हणजेच स्थूलता हा उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे नेहमी वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. योग्य प्रकारचा व्यायाम आणि योग्य प्रकारचं डाएट ककेल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ताणतणाव
ताणतणाव यामुळे देखील उच्च रक्तदाबाच्या समस्येत वाढ होते. यासाठी तणावार नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी गरज असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याची मदत घ्या.