मुंबई : आजकालच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आहाराच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे काही जण हट्टाने रात्री जागरणं करतात तर काहींना निद्रानाशेचा त्रास होतो. सुरूवातीला लहान वाटणारा हा त्रास हळूहळू गंभीर होऊ शकतो. निद्रानाशेतून लाईफस्टाईशी निगडीत अनेक समस्या वाढतात. मग या निद्रानाशेवर उपाय म्हणून तुमच्या आहारात हे बदल करून पहा. 'या' उपायाने मिनिटाभरात झोपी जाण्यासाठी मेंदुला द्या संकेत !


निद्रानाशेवर मात करतील हे घरगुती उपाय  


चेरी - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेरीमधील मेलाटोनिन घटक झोपेचं चक्र सावरण्यासाठी मदत करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस ताजी चेरी खाल्ल्यास निद्रानाशेच्या समस्येवर मात करता येऊ शकते. 


भात - 


भातामुळे झोप येते असे काहींचे मत आहे. जास्मिन राईस रात्री झोपण्यापूर्वी चार तास आधी खाल्ल्यास झोप येण्यास मदत होते. शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे


केळी- 


केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम घटक मुबलक असतात. यामुळे मसल्स शांत होण्यास मदत होते. परिणामी निद्रानाशेवर नैसर्गिक उपायांनी मात करता येऊ शकते. अति पिकलेली केळी खावीत का ?


सिरीअल्स -  


रात्री झोपण्यापूर्वी पचायला हलके असणारे कार्ब्सयुक्त पदार्थ खाल्ल्यास झोप येण्यास मदत होते. 


रताळं -  


रताळ हे उपवासाच्या दिवसातील आहार नाही. रताळ्याच्या सेवनामुळे झोप येण्यास मदत होते. रताळयामध्ये झोप येण्यास मदत करणारे कार्बोहायड्रेटेस असतात, सोबतच पोटॅशियम घटकामुळे झोप येण्यास मदत होते. रताळं खाण्याचे आरोग्यदायी फायदे


दूध - 


दूध हे पूर्णअन्न असल्याने त्याचा आहारात समावेश करणं आरोग्यदायी आहे. दूधामध्ये झोपेला चालना देणारे घटक असल्याने रात्री झोपण्यापूर्वी जायफळाचे किंवा हळदीचं दूध पिणे फायदेशीर आहे. थंड दूध पिण्याचे ८ जबरदस्त फायदे!


हर्बल टी -  


कॅफिनयुक्त पेय म्हणजेच चहा, कॉफी यामुळे झोप कमी होते, सुस्तपणा जातो. परंतू हर्बल टीच्या सेवनामुळे झोप येण्यास मदत होते.