Itchy Eyebrows: भुवयांमध्ये खाज सुटतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात; वेळीच करा `हे` घरगुती उपाय
How To Get Rid Of Itchy Eyebrows: अनेकदा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या भागात खाज सुटण्याच्या तक्रारी असतात. त्या तक्रारींपैंकी एख तक्रार असते अनेकदा लोकांना भुवयांच्या (Itching near eyebrows) जागेवर खाज येते.
How To Get Rid Of Itchy Eyebrows: अनेकदा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या भागात खाज सुटण्याच्या तक्रारी असतात. त्या तक्रारींपैंकी एख तक्रार असते अनेकदा लोकांना भुवयांच्या (Itching near eyebrows) जागेवर खाज येते. काहींना ही गोष्ट फार मामुली वाटते परंतु तसे नसून ही समस्या गंभीर असू शकते. जर तुम्हाला वारंवार अशी प्रकारे भुवयांच्या जागी खाज येत असेल तर वेळीच त्यावर उपाय करणं गरजेचे आहे. कारण जर ही समस्या वाढू लागली तर त्याचा फार वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ (health tips for itching eyebrows) शकतो. तेव्हा वेळीत समजून घ्या यावरचे उपाय नाहीतर पडेल महागात. भुवयांच्या आतील स्किन ही नाजूक असते त्यामुळे आपल्यालाही अनेकदा खाजवल्यानं खूप जास्त स्किम प्रोब्लेम्सही येऊ शकतात. जर तुम्ही सारखं सारखं खाजवलंत तर तुमचा तो भाग खाजवून खाजवून लालही होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया यावरचे हटके आणि इझी उपाय. (how to get rid of itching in eyebrows use these tips lemon juice skin exfoliation tea tree oil)
खाज नक्की कशामुळे येते?
थंडीमध्ये आपल्याला त्वचेसंबंधी समस्या सतावू लागतात. त्यात ड्राय स्किन आणि खाज सुटण्याच्या तक्रारी खूप कोमनही असतात. त्यामुळे आपण तऱ्हेतऱ्हेचे फेस क्रीम, स्कीन क्रीम लावायचा प्रयत्न करतो. अनेकदा आपली समस्या दूर करण्यासाठी आपण अशा स्क्रिम्सचा भडिमारही करतो. परंतु या समस्येवर आपण घरच्या घरीही उपाय करू शकतो. एक्जिमा, भुवयांमधील कोंडा, प्रदूषण आणि सोरायसिसमुळेही तुमच्या भुवयांना खाज येऊ शकते. जर तुम्हाला हा त्रास फार जास्त होत असेल तर तुम्हाला वेळीच तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला मोठ्या प्रमाणात खाज सुटत नसेल आणि समस्याही फार गंभीर वाटत नसेल तर तुम्ही लक्षणांवर काम करून घरगुती उपायांनीही आराम मिळवू शकतो. घरगुती उपायांनी खाज सुटणं आणि जळजळ होणं आपण दूर करू शकतो.
काय कराल उपाय?
1. लिंबाचा रस (Lemon Juice) हा आपल्या कुठल्याही त्वेचसाठी रामबाण उपाय आहे. कोंडा, मृत त्वचा आणि पेशींमुळे जेव्हा खाज वाढू लागते तेव्हा त्यावर लिंबाचा रस लावा. यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या. त्यात एक चमचा नारळ आणि त्यात ऑलिव्ह ऑइल टाका. मग हे मिक्चर तुमच्या भुवयांना लावा आणि 30 मिनिटे साधारणत: ठेवा आणि मग धुवा. खाज सुटण्याची समस्या नक्कीच दूर होईल. हे तुम्ही दोनदा भुवयांना लावू शकता.
2. भुवयांना मॉइश्चरायझर (moisturizer) लावायची सवय लावा. कारण जर तुम्हाला भुवयांना खाज सुटतं असेल तर लगेचच मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेची जळजळही कमी होते. मॉ़इश्चरायझ तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यास मदत करते. खासकरून हिवाळ्यात तुम्ही मॉइश्चरायझर लावा. अशावेळी त्याचा फार चांगला फायदा होऊ शकतो.
3. टी ट्री (Tea Tree Oil) ऑईल हे एक नैसर्गिक ऑईल आहे. हे एसेंशिसल ऑईल तुम्ही त्वचेच्या कोणत्याही समस्येवर लावू शकता. हे लावल्यानं संसर्ग आणि जळजळ दूर होते. हे लावण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या त्यात टी ट्री एसेन्शियल ऑईलचा एक थेंब मिसळा आणि हे मिक्सचर तुमच्या भुवयांना लावून त्यांचा मसाज करा. हे लावल्यानं तुमची खास कमी होईल आणि कोणत्याही प्रमाणात बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्ग तुमच्या भुवयांना होणार नाही. एका वेळीच एक किंवा दोन थेंबांपेक्षा जास्त तेल वापरू नका. आवश्यकतेपेक्षा जास्त तेल लावलंत तर त्वचेची जळजळ वाढू शकते.