मुंबई : अनेक मुली चेहर्‍यावरील अनावश्यक केस ब्राऊन करण्यासाठी, टॅनिंग, डार्क स्पॉट, चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी ब्लिचिंग करतात. ब्लिचिंगमुळे चेहर्‍यावरील छुपी घाण, प्रदुषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लिचिंगमध्ये केमिकल घटक अधिक असतात. अनेकदा संवेदनशील त्वचेला त्यामुळे नुकसान होऊ शकते. काहींना जळजळ जाणवते. ब्लिचमुळे तुमच्या त्वचेवरही जळजळ होत असल्यास काही खास टीप्स लक्षात ठेवा.  


1. ब्लिच करण्यापूर्वी त्याची पॅचटेस्ट नक्की करून घ्या. थेट त्वचेवर लावण्याआधी हातावर त्याची पॅच टेस्ट करा. जर जळजळ जाणवल्यास त्याचा वापर करण्यासाठि योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. 
त्रास टाळण्यासाठी बाजारात अनेक हर्बल, लाईट अमोनियायुक्त ब्लिचचा वापर करा. 


2. अनेकदा बाजारात शरीरासाठी आणि चेहर्‍यासाठी वेगवेगळे ब्लिच उपलब्ध असतात. मात्र मुली ते विकत घेताना पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे दोघांमधील फरक न समजल्याने, चूकीच्या ब्लीचची निवड केल्याने त्रास होऊ शकतो. 


3. ब्लिच करण्यापूर्वी चेहर्‍यावर बर्फाचा मसाज करणं फायदेशीर आहे. 2-3 मिनिटं बर्फाचा मसाज केल्याने चेहर्‍याला होणारा त्रास कमी होतो.  


4. अमोनिया फ्री ब्लिचमुळे त्वचेला नुकसान होत नाही. त्याचा वापर केल्याने त्वचेवर लालसरपणा वाढणं, खाज येणं, अ‍ॅलर्जीचा धोकाही कमी होतो.