या पद्धतीने उन्हाळ्यात त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवा...
प्रत्येक ऋतूत त्वचेच्या गरजा बदलत असतात. उन्हाळ्यात त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. नाहीतर त्वचा खूप रखरखीत आणि कोरडी होते.
मुंबई : प्रत्येक ऋतूत त्वचेच्या गरजा बदलत असतात. उन्हाळ्यात त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. नाहीतर त्वचा खूप रखरखीत आणि कोरडी होते. उन्हाळ्यात त्वचेतून ओलावा पटकन निघून जातो. यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी दिवसातून १०-१२ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे तसेच दिवसभर फळांचे सेवन करणे आवश्यक असते. इतकंच नव्हे तर आणखी काही टिप्सनी तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवू शकता. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी डाएटमध्ये टोमॅटो, झुकिनी, दही यांचा समावेश कऱणे अत्यंत आवश्यक असते. त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या टिप्स
रात्री झोपण्याआधी त्वचा साफ करुन टोनिंग आणि मॉइस्चराइजिग करा.
दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्वचेला स्क्रबच्या सहाय्याने स्वच्छ करा.
जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीनचा जरुर वापर करा. सनस्क्रीन अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून बचाव करतो.
उन्हाळ्यात मेकअप कमी करण्याकडे भर द्या. मेकअपमुळे चेहरा चिकचिकीत होतो.
घरगुती फेस पॅकचा वापर करा. दूध, मध, दलियासारख्या पदार्थांचा वापर करुन फेसपॅक तयार करा. तुम्ही फळांचाही फेसपॅक तयार करु शकता.