मुंबई : शरीराच्या इतर भागांप्रमाणेच नाभी म्हणजेच बेंबीचीदेखील स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धूर, धूळ, प्रदुषण,  क्रीम्स, लोशन अशा अनेक गोष्टींचा नकळत मारा झाल्याने बेंबीमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो. सोबतच क्रॉप टॉप घातल्यास अस्वच्छ बेंबीमुळे सारा लूकच बिघडू शकतो.  


कशी ठेवाल सफाई 


खरंतर शरीराच्या इतर भागांइतकीच बेंबीची काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे. यासाठी दोन मार्ग आहेत.  


१.  ओला कापूस  


आंघोळीच्या वेळेस तुम्ही बेंबीलादेखील स्वच्छ ठेवू शकता. याकरिता साबणाच्या पाण्यामध्ये, कापसाचा गोळा भिजवा. कापसाचा गोळा गरम पाण्यात बुडवून त्यातील अतिरिक्त पाणी काढून काढा. कापसाचा बोळा बेंबीमध्ये फिरवा. यामुळे मळ बाहेर पडेल सोबतच जंतूचा छुपादेखील कमी होतो. 


कापसाचा साधा गोळा किंवा इअर बडचा वापर करू शकता. 


२.  गरम तेल 


गरम तेलाचे काही थेंब कापसावर घ्या. तो कापसाचा गोळादेखील बेंबीमध्ये फिरवू शकत. किंवा पाठीवर झोपून बेंबीत तेलाचे काही थेंब टाका. बोटाने बेंबीत घडाळ्याच्या दिशेने मसाज करा. मळ बाहेर पडेल तो स्वच्छ करा. 


बेंबीचा मळ कोरडा खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. कोमट तेल किंवा पाण्याचा वापर करा. तसेच तुम्हांला बेंबीजवळ एखादे इंफेक्शन झाले असेल तर ते नीट स्वच्छ करण्यासाठी तज्ञांची मदत घ्या. अन्यथा त्रास अधिक गंभीर होऊ शकतो.