मुंबई : गर्भाच्या योग्य विकास व्हावा याकरिता त्याला 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते. मात्र काही कारणांमुळे, चूकीच्या लाईफस्टाईलमुळे महिलांमध्ये प्रिमॅच्युअर डिलेव्हरी होण्याचा धोका असतो. मग 37 आठवड्यापूर्वीच लेबर पेन सुरू झाल्याचा धोका  ओळखण्यासाठी काही लक्षणांबाबत पुरेशी जागृकता आवश्यक आहे. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !


वेळेपूर्वी प्रसुती होणार असल्याचा धोका कसा ओळखाल ? 


कंबरदुखी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोपणाच्या काळामध्ये कंबरदुखीचा त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र वेळेपूर्वीच लेबर पेन सुरू झाल्यास कंबरेमध्ये वेदना जाणवणं अधिक तीव्र होते. कंबरेच्या खालच्या बाजूला वेदना अतिप्रमाणात जाणवायला सुरूवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.  


रक्तस्त्राव - 


वेळेपूर्वी लेबर पेन सुरू झाल्यास योनीमार्गामध्ये रक्तस्त्राव सुरू होतो. हे प्रिमॅच्युअर डिलेव्हरी होण्याचा मोठा संकेत आहे. याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. 


दबाव वाढतो -


पेल्व्हिक भागात दबाव जाणवण्यासोबतच, योनिमार्गात वेदना जाणवत असल्यास हे प्रिमॅच्युअर डिलेव्हरीचे लक्षण आहे. 


मन घाबरते - 


गरोदरपणाच्या काळात उलटीचा त्रास, मन अस्वस्थ होणं हा त्रास जाणवतो. मात्र लेबर पेन सुरू झाल्यानंतर मनाची अस्वस्थताही वाढते. 


आकुंचन - 


वेळेच्यापूर्वी डिलेव्हरी होण्याचं एक लक्षण आकुंचन जाणवणं. दर दहा मिनिटांनी तुम्हांला हे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्त्रियांना या गोष्टीची जाणीव होत असल्यास दुर्लक्ष करू नका.