Exercise for Weight Loss : वजन वाढलं की सर्वात वेगाने कमरेच्या बाजूची चरबी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या चरबीला  साईड फॅट अंसही म्हणतात. साईड फॅट कमी करण्यासाठी अनेकजण जीम लावण्याचा विचार करतात. मात्र रोजच्या नोकरी आणि कामांमुळे जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र तुम्ही घरी बसूनही तुम्ही साईड फॅट घालवू शकता. काही व्यायाम आहेत ज्याने तुमच्या पोटाची चरबी सहज कमी करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

crunches
हा व्यायाम तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता. हे करण्यासाठी, तुम्ही टीव्ही पाहताना सरळ सोफ्यावर बसा. खांद्याच्या रुंदीवर पाय उघडा. आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्या आणि हात एकमेकांना जोडून घ्या. नंतर कंबरेपासून शरीर उजवीकडे वळवा. आता हा व्यायाम दुसऱ्या बाजूने करा. लक्षात ठेवा, हा व्यायाम अनेक वेळा करावा लागेल.


Side Bend Exercise
हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम सोफ्यावर सरळ बसा. आता यानंतर तुमचा उजवा हात विरुद्ध पायाच्या गुडघ्यावर ठेवा, त्यानंतर आता उजवा हात हवेत फिरवत शरीर सरळ करा. आता 45 सेकंद या स्थितीत रहा, नंतर हा व्यायाम पुन्हा दुसऱ्या बाजूने करा.


Legs up Exercise, Legs Down Excercise
सोफाच्या बाजूला झोपून तुमचा एक पाय सरळ करा. दुसरा पाय वर आणि खाली सरळ करा, नंतर पाय खाली करा. दुसऱ्या बाजूनेही असेच करा, हा व्यायाम अनेक वेळा करा.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)