मार्केटमधून स्क्रब विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवा `हे` आयुर्वेदिक Body Scrub
Home Made Body Scrub : मार्केटमधून बॉडी स्क्रब घेता... इतके पैसे आणि वेळ खर्च करूनही वाटतं असेल भीती? तर घरच्या घरी बनवा आता बॉडी स्क्रब या बॉडी स्क्रबनं फक्त टॅन जाणार नाही, तर त्वेचा उजळण्यापासून शरिरावर असलेले पुरळ देखील कमी होतील.....
Body Scrub : आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे बॉडी स्क्रब वापरतात. त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरावर असलेला मळ निघून जाण्यासाठी. पण मार्केटमधून आणलेलं बॉडी स्क्रब हे आपल्यासाठी किती फायदेशीर आहे? यावर आपण काही बोलू शकत नाही. पण हेच बॉडी स्क्रब जर आपण घरीच बनवलं तर त्याचे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता खूप कमी असते. आता यावरही घरच्या घरी मार्केटमध्ये मिळतं तसं बॉडी स्क्रब आपण कसं बनवू शकतो? असा सवाल अनेकांना असेल. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी स्क्रब कसं बनवायचं हे जाणून घेणार आहोत.
घरच्या घरी तुम्ही संत्र्याचं बॉडी स्क्रब बनवू शकतात. संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही मार्केट मधून घेतलेल्या अनेक बॉडी स्क्रब किंवा मग इतर अनेक प्रोडक्ट्समध्ये संत्रं असल्याचे त्यात सांगितले जाते. आज आपण संत्र्यापासून बनवलेलं बॉडी स्क्रबविषयी जाणून घेणार आहोत. संत्र्याच्या बॉडी स्क्रबचा वापर केला तर तुमच्या शरीरावर असलेले पिंपल्स आणि डागांचे प्रमाण कमी होते. बऱ्याचवेळा तर ते निघूनही जातात. संत्र्यामुळे तुम्ही तरुणही दिसतात आणि तुमचा रंगही उजळतो. चला तर मग जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचा बॉडी स्क्रब कसं बनवायचा.
संत्र्याच्या साली पासून स्क्रब कस बनवाल?
संत्र्याच्या सालीचं बॉडी स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक भांड घ्या. त्यानंतर दोन संत्र्यांच्या साली मिक्सर जारमध्ये बारीक करून त्याची पावडर टाका. त्यानंतर तुम्ही त्यात 2 ते 4 चमचे कच्चे दूध आणि सुमारे 2 ते 3 चमचे गुलाबजल त्यात घाला. यानंतर या तीन गोष्टी नीट मिक्स करा आणि त्याची एक स्मूद पेस्ट बनवा. अशा प्रकारे तुमचे संत्र्याचे बॉडी स्क्रब तयार झाले.
हेही वाचा : तुमची त्वचा झाली ड्राय? तर वापरा हे Body Butter त्वचा होईल कोमल
संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं हे स्क्रब कसं वापरायचं?
संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं हे स्क्रब लावण्याआधी चेहरा किंवा अंगावर पाणी घालून धुवून घ्या आणि पुसून घ्या. त्यानंतर मेकअप ब्रशच्या मदतीनं हे स्क्रब चेहऱ्यावर लावा. हे स्क्रब असचं 5 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर हलक्या हातानं मसाज करा. मग कापूस आणि पाण्याच्या मदतीनं चेहऱ्या नीट साफ करा. जर तुम्हाला त्याचा लवकरच चांगला परिणाम हवा असेल तर आठवड्यातून दोन वेळा हे स्क्रब वापरा, त्यानं तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर असलेलं टॅन किंवा मग मळ निघून जाईल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)