Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा (tea) दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का की चहा पिण्याचे अनेक तोटे आहेत आणि आपल्या शरीराला (tea side effects to health) त्याचा फार घातक त्रासही भोगावा लागतो. यामुळे आपली पचनक्रिया (digestion) खराब होऊ शकते आणि आपल्याला त्यामुळे मानसिक त्रासही (mental stress) होऊ शकतो. अनेकांना सारखा सारखा चहा पिण्याची सवय लागलेली असते. त्यांना आपली ही सवय सोडायची असते परंतु काही केल्या त्यांची ही सवय सुटता सुटत नाही. तेव्हा काळजी करू नका या लेखात आपण जाणून घेऊ शकतो की चहाचा अतिरेक कसा टाळावा आणि ही सारखं सारखं चहा पिण्याची सवयही (tea drinking habits and addiction) कशी मोडावी ते. (how to overcoming tea drinking addiction for better health know more)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाण्यानंतर चहा हे एकमेव पेय आहे जे या पृथ्वीवर कदाचित सर्वाधिक वापरले जाते. लोक सकाळी उठल्याबरोबर बेड टीची (bed tea) मागणी करतात. यासोबतच त्यांना दिवसभर चहाचा आग्रह जाणवतो. तो प्यायल्याने त्यांना ताजेतवाने वाटते पण चहा पिण्याचे तोटेही तितकेच जास्त आहेत यात शंका नाही. त्यात कॅफिनचे (caffeine) प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब (blood pressure) वाढवू शकते. इतकंच नाही तर रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अपचनाच्या तक्रारी होतात पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जर एखाद्या व्यक्तीला चहाची सवय सोडायची असेल तर त्याच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत.  


हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती


1. चहाचा वापर कमी करा (stop drinking it intentionally)


चहा सोडण्यासाठी खूप गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवतं नाही की तुम्हाला चहा सोडायचा आहे, किंवा कमी प्यायचा आहे, त्याचे सेवन कमी करायचे आहे तोपर्यंत ते तुमच्याकडून होणार नाही. ज्यांना चहाची खूप आवड आहे किंवा ज्यांना डोकेदुखीवर औषधाऐवजी चहाची गरज आहे त्यांनी याचा गांर्भियानं विचार करावा. पण जर तुम्हाला खरंच चहा सोडायचा असेल तर तो रोज पिणं टाळा किंवा रोज प्यायला तरी पुन्हा दिवसांत दुसऱ्या चहा पिण्याचा मोह कमी करा. चहा प्यावासा वाटतं असेल तर तुम्ही ताबडतोब दुसरं पेय शोधा आणि तज्ञांच्या सल्ल्यानं त्यावर उपाय करा. याने तुमचा चहा सतत पिण्याच्या सवयीला आळा बसायला सुरूवात होईल. 


2. हर्बल चहाचे सेवन (Drink Herbal Tea)


अनेकांना चहाचे वेड असते परंतु काही कारणास्तव त्यांना चहा सोडावा लागतो ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो परंतु नंतर जर तुम्हाला तो सोडायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही हर्बल चहाचे (herbal tea) सेवन करू शकता. तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे कारण त्यात कॅफिन (less caffeine) जास्त प्रमाणात नसते.


3. दुपारी चहा ऐवजी ज्यूस प्या (drink juice instead of tea) 


दुपार होताच आपल्यााला चहाची गरज भासू लागते, चहा पिणार्‍यांची सवय सोडवणे थोडे कठीण असते पण असे होत नाही की तुम्ही ती काढू शकत नाही. पण तुम्ही ठरवलं तर तुम्ही ही सवय मोडून काढू शकता. यासाठी चहाऐवजी फळांचा रस (Fruit Juice) प्यावा. अनेकांना जेवणानंतरही चहा प्यायला आवडतो परंतु त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे चहा सोडून द्यावा लागतो यासाठी जेवणानंतर रस (juice after dinner) प्यावा. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचा समतोल राखला जातो आणि चहाची सवय सोडणे सोपे जाते. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)