Omicron Variant Update : भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) संसर्गाचा धोका वेगाने वाढत आहे. देशात कोरोनाच्या या नवीन प्रकाराने संक्रमित झालेल्यांची संख्या 650 च्या पुढे गेली आहे. ओमायक्रॉनची झपाट्याने वाढणारी प्रकरणं आरोग्य तज्ज्ञांसाठीही गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या लोकांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांनीही सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे.


ओमायक्रॉनच्या वाढता धोका रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याबाबत अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापिका डॉ. लीना वेन यांनी '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला सांगितला आहे. 


काय आहे '2 आउट ऑफ 3' फॉर्म्युला
डॉ. लीना वेन म्हणतात, जगात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने लोकांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. यासाठी '2 आउट ऑफ 3' हा फॉर्म्युला प्रभावी ठरू शकतो. या नियमानुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी तीनपैकी किमान दोन संरक्षणात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी लस, मास्किंग आणि चाचणी हे तीन प्रभावी उपाय मानले जातात.


मास्क आणि लसीकरण सर्वात महत्वाचं
Omicron धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी, पूर्वीपेक्षाही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 व्हेरिएंटविरुद्ध मास्कचा वापर सर्वात प्रभावी ठरु शकतो. त्यानंतर सर्वात मोठा बचाव म्हणजे लसीकरण. ओमायक्रॉनपासून बचावासाठी लसीकरण हा सध्यातरी प्रभावी उपाय नाही. पण लसीकरणामुळे संसर्गाची तीव्रता किंवा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी ते मोठया प्रमाणावर उपयुक्त आहे.


सेल्फ आयसोलेशन महत्त्वाचं
जगातील बहुतेक देश आता Omicron व्हेरिएंटच्या विळख्यात अडकले आहेत. यापासून बचाव करण्याच्या उपायांबाबत प्रोफेसर वेन म्हणतात, जोपर्यंत जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, तोपर्यंत आपण शक्यतो घरात राहिलं पाहिजे तसंच गर्दी टाळणं हाच सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ज्या भागात संसर्गाची जास्त प्रकरणे आहेत, तिथल्या लोकांना कोविड नियमांबाबत जागरूक करणं आणि त्यांचं लवकरात लवकर लसीकरण करून चाचणी वाढवणं खूप महत्वाचं आहे.


खबरदारी घेण्याची गरज
ज्या लोकांचं अजून लसीकरण झालेलं नाही त्यांच्यापासून संसर्ग होण्याचा आणि कोरोनाचा वाहक होण्याचा सर्वाधिक धोका असतो. असे लोक इतरांसाठीही समस्या निर्माण करू शकतात. अशात आपण स्वत:च खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी मास्क घालणं अनिवार्य केलं पाहिजे. '2 आउट ऑफ 3' हा नियम लक्षात घेऊन प्रत्येकाने सध्यातरी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत डॉ.वेन यांनी व्यक्त केलं आहे.