Health News : हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या (Health) तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित आजार होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणं आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी (Winter Health Tips) आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात (Diet tips for winter season) योग्य आहार महत्त्वाचा असतो. काय खावं आणि काय खाऊ नये, याचं नियोजन करणं गरजेचं असतं. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं फायदेशीर ठरतं. डिंकामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. हिवाळ्यात डिंकाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजीबाईच्या बटव्यात नेहमी डिंकाचा लाडू पहायला मिळतो. कारण डिंक आरोग्यासाठी उत्तम असतो.


डिंकाच्या लाडूचे फायदे - 


डिंक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्याने रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. या डिंकांच्या लाडूंमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्याचा फायदा होतो. ते खाल्ल्याने शरीरात ऊब निर्माण होते.


डिंक हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. डिंकाचे लाडू खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे स्नायूही मजबूत होतात. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी डिंक फायदेशीर आहे. गरोदर महिलांसाठी डिंकाचे लाडू देखील फायदेशीर मानले जातात.


आणखी वाचा - Breakfast Tips : सकाळी नाष्टा न केल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!


दरम्यान, डिंक, नारळ, पंजिरी, खसखस आणि पीठ मिसळून लाडू आणि चिक्की बनवता येतात. तुपापासून बनवलेले हे लाडू शरीराला मजबूत बनवण्याचे काम करतात. हिवाळ्यात (safety tips for winter season) पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी. आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होईल.