Health Tips : वाढत्या प्रदुषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
Health Tips In Marathi : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर दिल्लीत देखील प्रदुषणामुळे लोकांना त्रास होताना दिसतोय. या कढीण काळात तुम्ही डोळ्यांची (Protect Eyes From Air Pollution) कशी काळजी घ्याल? पाहा..
Protect Eyes From Air Pollution : मुंबई शहरासह (Mumbai Air Pollution) उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मुंबईसह दिल्लीमध्ये (Delhi Air Pollution) देखील प्रदुषणामुळे नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. सततचा खोकला, सर्दी आणि डोळे चुरचुरणे (Protect Eyes From Air Pollution) अशा समस्यांना समोरं जाव लागतंय. प्रदूषित हवेमुळे लोकांचे जगणं कठीण झालं असून त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतंय.
दिल्लीमध्ये मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरणं अवघड झालंय. अशातच तुम्हालाच तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर दररोज नियमित उपाय करणं गरजेचं आहे. हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होऊ लागतात आणि डोळ्यांचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता..
कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडणं टाळा आणि महत्त्वाचे काम असेल तेव्हाच बाहेर जा. सध्या बऱ्याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असतात. त्यामुळे घरीच राहून काम होत असेल तर त्यावर भर द्या.
घरातून बाहेर जाताना मास्क तर तुम्ही घालतच असाल. पण त्याचबरोबर तुम्ही चष्मा देखील वापरू शकता. त्यामुळे हवेतील कण डोळ्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखले जातात.
प्रवास करण्याची वेळ आली तर तुम्ही दर अर्ध्या तासाने डोळे धुतले पाहिजे. डोळ्यांची जळजळ किंवा ऍलर्जी झाल्यास डॉक्टरांच्या सल्लाने ड्रॉप घ्या. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा, त्यामुळे डोळ्यांना अलर्जी होणार नाही, याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे.
शहरी भागात वायू प्रदूषणापासून आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा. त्याचबरोबर विकेंडला तुम्ही शहरातून निसर्गाच्या सानिध्यात बाहेर थांबू शकता.
आणखी वाचा - मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
दरम्यान, प्रदुषणामुळे बहुतांश लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. विषारी हवेमध्ये स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होते. येथे जाणून घ्या अशा काही प्यूरिफाइंग प्लांट्सची नावे जी तुमचे आरोग्य चांगले ठेवतील.