Weight loss Tips : शुगर क्रेविंग कशी कमी कराल?
आपल्यातील बरेच लोकं वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर यांचं प्रमाण कमी असतं. डाएटवर असणाऱ्या लोकांना बर्याचदा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्याला जास्त भूक लागते. या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
मुंबई : आपल्यातील बरेच लोकं वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर यांचं प्रमाण कमी असतं. डाएटवर असणाऱ्या लोकांना बर्याचदा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्याला जास्त भूक लागते. या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. अशावेळी गोड खाण्याची इच्छाही आपण टाळली पाहिजे. जाणून घेऊया शुगर क्रेविंगला कमी कसं करायचं.
लोणचं
बहुतांश लोकं तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळतात. घरी तयार केलेलं लोणंतं प्रोबायोटीक असतं. आणि ते संतुलित आहारासाठी एकदम परफेक्ट असतं. लोणचं चांगल्या बॅक्टेरियांचा मुख्य स्त्रोत असतं. जो आतड्यांना चांगलं ठेवण्यास मदत करतो. याशिवाय साखरेला नियंत्रित करून पचन तंत्राला उत्तम ठेवण्यास मदत करतं.
डाळ
आहार भिन्न भिन्न डाळींचा समावेश केला गेला पाहिजे. बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत जे आरोग्यासाठी फायद्याच्या आहेत. हे खाल्ल्याने तुमचे पोट बर्याच वेळेस भरलेलं राहतं. मुख्य म्हणजे डाळ साखरेची इच्छा कमी करण्यात देखील मदत करते.
बाजरी
बाजरी हे ग्लूटेन फ्री असतं. शिवाय त्यामध्ये पौष्टिक घटकंही असतात. हे गव्हापेक्षाही पौष्टिक असून अंतर्गत प्रणालीसाठी बर्याच प्रकारे महत्वाचं आहे. ज्वारीचा तुम्ही तुमच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. आठवड्यातून दोनदा ज्वारीचे पदार्थ खाऊ शकता.