मुंबई : तुमच्या नक्षीदार, व्हेवी ड्रेसमधील एखादा खडा/ हिरा पडलेला असो किंवा सिरॅमिकची एखादी भेटवस्तू तुटलेली असो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर ती वस्तू तुमच्यासाठी अगदीच खास असेल तर फेकून न देता तुम्ही अनेकदा फेविक्विकचा वापर करता. 


नाजूक काम करताना अनेकदा फेविक्विक अधिक प्रमाणात येते. फेविक्विक जोडकाम हमखास करत असले  तरीही त्याचा वापर करताना हाताला लागतेच. हळूहळू ते सुकले की कडक होते. मग त्याला हातावरून काढणं कठीण होऊन बसते. 


फेविकॉल हाताला लागल्यास त्याचे पापुद्रे निघतात. परंतू फेविक्विकचे तसे नसते. मग हाताला चिकटलेले फेविक्विक कसे काढावे ? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर अगदीच सहजसोपा आणि मुलींकडे हमखास मिळणारा हा पदार्थ फेविक्विक चटकन आणि सुरक्षितपणे दूर करते.  


कसे काढाल फेविक्विक ? 


हाताला फेविक्विक चिकटल्यासारखे वाटल्यास शक्यतो त्यावर लगेच बोट लावू नका. तुमचे बोट किंवा इतर कोणतीही गोष्ट चिकटू शकते. अशावेळेस हात मोकळा ठेवा आणि फेविक्विक तसेच सुकू द्यावे. 


त्यानंतर कापसावर नेलपॉलिश रिमुव्हर किंवा बाजारात मिळणार्‍या नेलपॉलिश रिमुव्हरच्या स्ट्रॅपने तो भाग पुसा. 


नेलपॉलिश रिमुव्हरऐवजी एसिटोनही वापरू शकता. 


फेविक्विक गेल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.