Dental plaque: दातांमध्ये जमा असलेला प्लाक कसा काढाल? `या` पद्धती करतील मदत
दातांच्या मध्ये अन्नाचे कण अडकून राहतात. या कणांमुळे तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया (Dental Bacteria) जमा होऊ लागतात. हेच बॅक्टेरिया एक चिकट पदार्थ तयार करतो.
How to Remove Plaque : तुमच्या दातांचा रंगही हल्का पिवळा झाला आहे का? किंवा दातांच्या मागच्या बाजूला भाग काहीसा पिवळ्या रंगाचा झालाय का? हा पिवळा पदार्थ म्हणजे प्लाक (Dental plaque) आहे. अधिकतर लोकं सकाळी उठल्याबरोबर दात घासतात (Brush Your TH) आणि त्यानंतर दिवसभर खातात. अशावेळी तुमच्या दातांच्या मध्ये अन्नाचे कण अडकून राहतात. या कणांमुळे तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया (Dental Plaque) जमा होऊ लागतात. हेच बॅक्टेरिया एक चिकट पदार्थ तयार करतो.
दातांमध्ये प्लाक जमा झाला की, दातांचे टिश्यू कमजोर होऊ लागतात. शिवाय यामुळे दातांच्या अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, दातांमध्ये जमा असलेला प्लाक तुम्ही कसा काढू शकता.
बेकिंग सोड आणि मीठ
दातांमध्ये जमा असलेला प्लाक तुम्ही घरगुती उपायांनी देखील काढू शकता. अर्धा चमचा बेकिंग सोड्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला. यामध्ये 8-10 थेंब मोहरीचं तेल वापरून पेस्ट तयार करा. आता या पेस्टद्वारे दात घासा. दातांच्या मागील बाजू पद्धतीने घासा. 3 दिवस दात घासल्याने हा प्लाक कमी होऊ लागेल.
जेवल्यानंतर लगेच दात साफ करू नका
अनेक लोकांचा असा समज असतो की, खाल्ल्यानंतर लगेच दात साफ केल्यानंतर ते चांगले राहतात. मात्र असं नाहीये. काहीही खाल्ल्यानंतर दात साफ करणं गरजेचं आहे, मात्र तातडीने दातांची सफाई करू नये. खाल्ल्यानंतर 30-40 मिनिटांनी दात साफ करावे.
जीभेचीही सफाई ठेवा
मुख आरोग्य साफ ठेवणं म्हणजे केवळ दात साफ ठेवणं नाही, तर जीभेची देखील स्वच्छता ठेवली पाहिजे. दात घासताना जीभेची देखील दोन्ही बाजूंनी सफाई केली गेली पाहिजे. जीभ साफ केल्याने अधिकतर बॅक्टेरिया साफ होतात. परिणामी प्लाक जमा होत नाही.
दातांना फ्लॉस करा
दात घासताना ब्रश जिथे पोहोचू शकतो, तिथल्याच भागाची सफाई होते. अशावेळी अनेकदा दातांमध्ये फसलेले कण ब्रश काढू शकत नाही, यासाठी फ्लॉस करणं गरेजचं असतं. फ्लॉसमध्ये एका धागाच्या मदतीने तुम्हाला दातांमधील सफाई करावी लागते.