Benefit of Sleeping Early: आजकाल कामाच्या गडबडीत आणि धकाधकीच्या जीवनात आपलं झोपेचं गणितही बिघडत चाललं आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक असते. मात्र, बिघडलेल्या जीवनशैलीमुळं 8 तासांची झोप घेणे खूप अवघड होते. तसंच, रात्री झोपायलादेखील उशीर होतो त्यामुळं सकाळी उठायलाही उशीर. रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी उशीरा उठणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय करावी. त्यामुळं आरोग्यही सुधारते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य, संपत्ती लाभे अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र ही म्हण प्रत्यक्षात मात्र कधीच उतरत नाही. कारण आत्ताचे कार्यालयीन वेळा आणि कामाचे शेड्युल यामुळं लवकर झोपणे होतच नाही. पण रात्री लवकर झोपण्याचे शरीराला असंख्य फायदे आहेत. काय आहेत हे फायदे जाणून घेऊया. 


मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर


पुरेशी झोप घेणे मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ज्यामुळं स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रोब्लेम सॉल्विंग स्किलचा समावेश आहे. लवकर झोपण्याने मेंदू मेमरी अधिक स्ट्रॉंग बनवते तसंच, न्यूरल जेनरेशनसारख्या आवश्यक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, जे लोक रात्री लवकर झोपतात त्यांचा मानसिक कार्यक्षमता अधिक जास्त सक्षम असते. रात्री मेंदूला आराम करण्यास आणि रिचार्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्ही मानसिकरित्या फ्रेश आणि दिवसभराची एनर्जी मिळते. 


मुड फ्रेश होतो


झोप कमी झाल्यास त्याचा परिणाम मुड रेगुलेशन आणि इमोशनल हेल्थवरही होतो. लवकर झोपल्याने तुम्ही पुरेशा प्रमाणात आराम करता. ज्यामुळं तुमची मानसिक स्थिती स्थिर राहते आणि चिडचिड व तणावदेखील कमी करण्यास मुख्य भूमिका निभावते. त्यामुळं तुम्हीदेखील रात्री लवकर झोपाल, या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्याल. पुरेशा प्रमाणात झोप घेतल्याने सेरोटोनिन आणि डोपामाइमसारख्या मुड रेगुलेशनसाठी न्युरोट्रान्समीटर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. त्यामुळं संपूर्ण मेंटलहेल्थमध्ये सुधार होतो. 


फिजिकल हेल्थ


रात्री लवकर झोप घेतल्याने मानसिक आरोग्य तर सुधारतेच त्याचबरोबर शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. संशोधनानुसार, जे लोक दररोज लवकर झोपतात त्यांना लठ्ठपणा, हृदय विकार आणि मेटाबॉलिज्मसारख्या रोगांचा धोका कमी होतो. लेप्टिन आणि ग्रेलिनसारख्या हार्मोन्स जे भुख आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात ते नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहेत. 


प्रोडक्टिव्हिटी वाढते 


जर तुम्ही रात्री वेळेत झोपलात आणि 7-8 तासांची झोप घेतल्यास तुम्ही मेंटल हेल्थ आणि फेजिकल हेल्थ स्ट्राँग ठेवण्यास मदत करते. तुम्ही दिवसभर तणावमुक्त राहतात. त्यामुळं ऑफिसमध्ये किंवा अभ्यासात तुमचं जास्त मन लागतं आणि त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी वाढते. जे तुमच्या करिअर आणि भविष्यासाठी खूप गरजेचे आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)