New born hiccups problem : लहान मुलांमध्ये जन्म झाल्यानंतर काही दिवसात उचकी लागण्याचाप्रमाणं वाढतं. अशावेळी आपल्याला  काय करावं हे सुचत नाही. आपण घाबरून जातो. पण घाबरून न जाता शांतपणे अगदी समजून घेऊन अशा परिस्थिती हाताळाव्या लागतात. उचकी लागल्याने बाळाला त्रास होतो. बाळाचा त्रास आईला बघवत नाही आणि मग बाळाच्या आईलासुद्धा काय करावं हे सुचत नाही. नवजात बाळांना उचकीचा त्रास सुरु झाल्यास काय करावं याविषयी आज जाणून घेऊया.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उचकीचा त्रास सुरु झाल्यावर काय करावं हे जाणून घेण्याऐवजी सर्वात आधी उचकी का लागते याविषयी जाणून घेऊया.   


नवजात शिशुंना उचकी लागण्याचं कारण 


​बाळ आईच्या पोटात 6 व्या महिन्यापासून उचकी घ्यायला सुरवात करते. बाळाच्या जन्मानंतर सर्वात आधी आईचं दूध घ्यायला सुरु करतो.  पोटातातील अन्न पुन्हा भोजन नलिकेमध्ये जातं. जेवणाचे कण पुन्हा अन्नननलिकेत जातात आणि अन्नननलिकेत  ऍसिड ट्रिगर होऊन डायफ्रॅममध्ये अडथळा निर्माण होतो आणि  उचक्या लागायला सुरवात होते.   


आईचं दूध आणि मुखतः बाटलीतून दूध प्यायल्याने लहान मुलांचं पोटगच्च होऊन जात. पोट अचानक फुगल्याने डायफ्रॅम खेचलं जात आणि पोट दुखून बालकांना उचक्या लागतात. 


ऍलर्जी आणि अस्थमाचा त्रास असू शकतो काहीवेळा माता स्तनपान करू शकत नाही अशावेळी बाळांना फॉर्मुला मिल्क देण्यात येतं. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्ननलिकेमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे डायफ्रॅम मध्ये अडथळा निर्माण होतो आणि उचकी लागते . 
याशिवाय अस्थमा असेल ब्रोंकाइल ट्यूब मध्ये सूज येते. ज्यामुळे फुफ्फुसांपर्यंत हवा पोहचत नाही यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो , आणि उचकी लागते. 


उचकी कशी थांबवायची 


 बाळाला उचकी लागली कि, काही घरगुती उपायांनी तुम्ही त्या थांबवू शकता.
जर तुमचं बाळ सॉलिड फूड खात असेल किंवा नुकतंच तुम्ही अन्न द्यायला सुरवात केली असेल तर त्यांच्या जिभेवर थोडी साखर ठेवा. आणि बाळ अगदीच लहान असेल तर पॅसिफायरमध्ये शुगर सिरप टाका आणि ते तोंडावाटे पोटात जाऊद्या. 


उचक्या येतं असतील तर मुलांना पोटावर झोपावं आणि पाठीला गोलाकार मसाज करा. 


प्रत्येक वेळी दूध पाजल्यानतंर बाळाला ढेकर काढायला विसरू नका. असं केल्यास डायफ्रामची पोजिशन योग्य राहते.


 नेहमीपेक्षा जास्त उचक्या लागत असतील 


नवजात बालकांना दररोज काही मिनिटे ते तासभर उचकी लागून राहते मात्र त्यापेक्षा जास्त वेळ उचकी लागतेय आणि कमी होत नाहीये तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य. उचकी लागताना मुलांच्या छातीतून आवाज येतं असेल त्वरित डॉक्टरना दाखवा.