मुंबई : केरळमध्ये सध्या निपाह व्हायरस (एनआईवी)मुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण असल्याचतं जरी म्हटलं असलं तरी स्वत:ला यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी. याबाबत तुम्हाला सांगणार आहोत. हार्ट केयर फाउंडनेशन (एचसीएफआई) अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी निपाह व्हायरसबाबत माहिती देतांना म्हटलं की, या आजारच्या वाढत्या प्रभावासोबतच आपल्याला आणखी एका लढाईसाठी तयार राहायचं आहे. हा आजार वटवाघुळामुळे पसरतो. यावर अजून कोणत्याही लसचा शोध लागलेला नाही.


बचाव करण्यासाठी काय कराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. प्राण्यांपासून स्वत:ला लांब ठेवा.  


2. जमीनवर पडलेले किंवा पक्ष्यांनी खाललेले फळ खाऊ नका.


3. शौचालयात वापरात येणारे वस्तू, बादली, मग स्वच्छ ठेवा.


4. निपाहच्या तापामुऴे मृत पावलेल्या व्यक्तीचं तोंड उघडं ठेवू नका. त्या व्यक्तीच्या संपर्कात जावू नका.


5. निपाहमुळे माणूस कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.


6. तुम्ही जे ही खात आहात ते वटवाघुळाच्या संपर्कात तर येणारं नसेल याची खात्री करुन घ्या.


निपाहची लक्षणे


निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिला डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मानसिक भ्रम, कोमात जाणे, गोंधळल्याची स्थिती निर्माण होणे अशी लक्षणे संभवतात. निपाह व्हायरसग्रस्त लोकांना श्वसनास त्रास होतो. तसेच, श्वास घेताना जळजळल्यासारखेही वाटते. या रूग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. डॉक्टर सांगतात की, काही रूग्ण २४ ते २८ तासांतच कोमामध्ये जाऊ शकतो.